देवघरात ठेवा हि १ वस्तू; सर्व संकटं होतील दूर, जे मागाल ते मिळेल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या घरी देव्हारा असणे अत्यावश्यक आहे. ज्या घरामध्ये देव्हारा नाही त्या घराला अध्यात्मिक दृष्ट्या महत्त्व नाही.जरी तुम्ही स्वतंत्र राहत असाल तरी त्या घरामध्ये देव्हारा असणे गरजेचे आहे. आपल्या घरामध्ये देव्हारा असणे शुभ मानले जाते. ज्या घरामध्ये परमेश्वराची नित्यनियमाने पूजा केली जाते अशा घरांमध्ये नेहमी परमेश्वराचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि अशा घरांमध्ये देवी देवता सुद्धा नेहमी निवास करत असतात. शास्त्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की जी व्यक्ती नित्यनेमाने जेवण करण्यापूर्वी देवांना नैवेद्य दाखवत असते त्या व्यक्तीला व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नेहमी पुण्य लाभत असते.
त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच धनधान्य गोष्टीची कमतरता राहत नाही म्हणूनच सकाळी संध्याकाळ देवाला नैवेद्य अर्पण करायला हवा. त्याआधी घरातील कोणत्या सदस्यांनी जेवण करायला नाही पाहिजे. जर तुमच्या घरी लहान मुलं असतील त्यांना जर खायला द्यायचे असेल तर अशा वेळी जेवण उष्ट् करण्याआधी आपण जेवणाची नैवेद्य थाळी बाजूला काढू शकतो आणि मगच लहान मुलांना खायला खायला देऊ शकतो.
तसे पाहायला गेले तर लहान मुले देवाचा अवतार असतात आणि म्हणूनच आपल्याला त्यांना जेवण देताना आधी एक चपाती बाजूला काढली तरी चालते. नंतर जेव्हा तुमची देवपूजा होईल तेव्हा तुम्ही हा नैवेद्य दाखवला तरी चालेल. असे केल्याने भविष्यात तुम्हाला दोन्ही वेळचे जेवण सहज प्राप्त होईल व या दोन्ही वेळचे जेवण मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण अजिबात येणार नाही.
आजच्या लेखामध्ये आपण देव्हाऱ्यात अशी एक वास्तू ठेवणार आहोत, त्या वस्तूच्या सहाय्याने आपल्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती, वैभव -समाधान प्राप्त होणार आहे व त्याचबरोबर आपल्या जीवनात देव्हारामध्ये आपण एक मंगल कलश प्रस्थापित करणारा आहोत आणि तो मंगल कलश कशा पद्धतीने प्रस्थापित करायचा आहे याबद्दलची महत्त्वाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
तसे पाहायला गेले तर प्रत्येक कुटुंबाची एक विशिष्ट अशी दैवत असते, त्या दैवताला आपण कुलदैवत व कुलस्वामिनी असे म्हणत असतो. या कुलदैवत व कुलस्वामिनी यांची पूजा करणे अत्यंत गरजेचे आहे कारण की आपले कुलदैवत व कुलस्वामिनी आपल्या कुटुंबावर जर एखादे संकट आले तर ते संकट दूर करते आणि आपल्याला कोणत्याही अडचणी शिवाय बाहेर काढते.
अनेकदा आपण पाहतो की अनेकांच्या देव्हारामध्ये कुलस्वामिनीचा कळस पुजलेला असतो. हा कळस आपल्या देव्हारामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे कारण की हा कलश आपल्या कुलदैवत आणि कुलस्वामिनी यांचे प्रतीक मानले जाते. ज्या घरातील देव्हारा मध्ये कुलदेवतेचा कलश असतो त्या घरावर कधीच संकट येत नाही त्या घरावर कुलदैवत चा आशीर्वाद सदैव असतो म्हणून आपल्याला कुलदैवतांची पूजा करणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर हा कुलदेवतेचा कलश आपल्याला विशिष्ट दिवशी आपल्या देव्हारामध्ये प्रस्थापित करणे आवश्यक आहे.
प्रत्येकाच्या कुलदेवतेचा वार हा वेगवेगळा असतो आणि म्हणूनच तुमच्या कुलदेवतेच्या वारानुसार तुम्हाला हा कळस तुमच्या देव्हारामध्ये प्रस्थापित करायचा आहे. कुलदैवत कळसाची स्थापना करण्यासाठी आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक रुपया व सुपारी टाकून एक नारळ तांब्यावर ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे विड्याची पाने व आंब्याची पाने असतील तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकतात अशा पद्धतीने कुलदैवतेचा मंगल कलश आपल्याला आपल्या देव्हारामध्ये कायमस्वरूपी ठेवायचा आहे.
या कलशाची पूजा आपल्याला नेहमी करायची आहे. दररोज मधील पाणी बदली करून तुळशीला किंवा अन्य झाडाला आपल्याला वाहायचे आहे आणि पुन्हा आपल्या देव्हारामध्ये हा मंगल कलश प्रस्थापित करायचा आहे. रोज पूजा करत असताना आपल्याला कलेश वरील नारळ बदली करायचा नाही तोच नारळ आपल्या ठेवायचा आहे.
जर एखाद्या वेळी नारळ भंग पावला तुटला तर तो वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे आणि नवीन कळस भरायचा आहे, अशा पद्धतीने आपण नेहमी आपल्या कुलदैवतेचा कलशाची पूजा करायची आहे असे जर आपण कायमस्वरूपी केले तर तुमच्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडू लागतील. तुमच्यावर माता महालक्ष्मी माता कुलस्वामिनी कृपादृष्टी राहील आणि तुमच्या जीवनामध्ये नेहमी उत्कर्ष होत राहील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.