तुम्हालाही ब्लडप्रेशर ची समस्या आहे का..? लगेच करा हा घरगुती उपाय..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो खूप आजारांनी आपण ग्रस्त असतो परंतु जेव्हा आजार आपल्या प्रत्यक्ष दर्शी पडतात किंवा आपल्याला समजतात तेव्हा आपल्याला समजते कि आपल्याला आजार झालेला आहे. तर ब्लड प्रेशर त्यापैकीच एक आजार आहे. जेव्हा आपण ब्लड प्रेशरने ग्रासले जातो तेव्हाच आपल्याला कळते कि आपल्याला ब्लड प्रेशर चा आजार आहे.
ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड खाणं आहे, अनियमित दिनचर्या आहे, तर या कारणांमुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ब्लड प्रेशर मुले हृदयाचे आजार,स्ट्रोक, अश्या समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लड प्रेशर च्या रुग्णाला दररोज औषध घ्यावी लागतात. तर आज आम्ही तुम्हाला अशी काही घरगुती औषध सांगणार आहोत कि ज्या मुळे तुम्हाला ब्लड प्रेशरचा जरा सुद्धा त्रास होणार नाही. हे घरगुती उपाय जर आपण करून पाहिले तर तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकेल.
मित्रांनो आपल्या घरात लसूण असतो. तर ब्लड प्रेशर च्या रुग्णांना लसूण हा अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्व असते जे नायट्रिक ऑकसाईड चे प्रमाण वाढवते. आणि त्यामुळे आपल्या मांस पेशींना आराम सुद्धा मिळतो. म्हणजेच एक प्रकारे मांस पेशी नायट्रिक ऑकसाईड चे प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढवण्याचे काम लसूण करतो. यामुळे ब्लड प्रेशर च्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी. म्हणजे जेवणानंतर किंवा जेवणाच्या अगोदर किंवा जेवणामध्ये लसूण आपण अवश्य खावी.
मित्रांनो शेवगा सुद्धा आपल्याला आजूबाजूला भेटतो. त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन असते. एका संशोधनामध्ये हे समजले आहे कि या झाडांचा पानाचा अर्क पिल्यास ब्लड प्रेशर च्या डायलॉस्टि आणि सिस्टोलिक कार्यप्रमाणीवर सकारात्मक प्रभाव पडतो. तसेच एखादा ब्लड प्रेशरचा रुग्ण असेल तर त्याने मसूर च्या डाळी सोबत शेवग्याचे सेवन अवश्य करावे. त्यामुळे त्याचे जे ब्लड प्रेशर आहे ते बॅलन्स मध्ये राहील.
जवस सुद्धा आपल्या घरी नसेल तर आपण दुकानातून आणून जवसाच्या उपयोग करावा. जावसमध्ये लिनोने लीक भरपूर प्रमाणामध्ये असतो. हे एक प्रकारचे ओमेगा ३ फॅटी औषध आहे. संशोधनानंतर समोर आले आहे की ज्या लोकांना हायपर टेन्शन ची समस्या असेल तर त्यांनी जेवणामध्ये जवसाच्या उपयोग केला तर त्यांचे ब्लड प्रेशर नियंत्रित राहू शकते यामुळे कोलेस्ट्रॉल ची मात्रा सुद्धा कमी होते.
वेलची सुद्धा आपल्या सर्वांच्या घरी असतेच. संशोधनानंतर असे समजले कि वेलची चे नेहमी सेवन केले तर ब्लड प्रेशर व्यवस्थित राहते. तर मित्रांनो हे चारही पदार्थांचा आपण जर वापर केला तसेच घरगुती उपाय अशाप्रकारचे योजले तर आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित राहील आणि त्याला ब्लड प्रेशरचा कुठलाच त्रास होणार नाही. आणि त्यामुळे आपल्या शरीरावर आपलं नियंत्रण सुद्धा राहू शकेल.
हे घरगुती उपाय जर का तुम्हाला आवडले असतील तर हि माहिती सर्वत्र नक्की शेअर करायला विसरू नका.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.