रात्री झोपण्यापूर्वी झाडुखाली ठेवा 1 वस्तू; प्रत्येक कामात मिळत जाईल यश.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. झाडू आपल्या घरातील घाण काढून आपले घर स्वच्छ ठेवत असते.असे म्हटलं जाते ज्या घरात स्वच्छता असते , त्या घरात सकारात्मक त्याचे वास्तव्य असते. अशा घरातील वास्तुदोष निघून जातात. झाडूच्या निगडीत काही नियम आहे व झाडूच्या अनेक उपायांनी आपण आपल जीवन सुखी व समृद्ध करू शकतो. आज आपण पाहणार आहोत की झाडूखाली अशी कोणती वस्तू आहे ती लपवून ठेवावी त्यामुळे आपले नशीब चमकेल.
असं म्हणतात की हात फिरे आणि लक्ष्मी वसे असे म्हटले जाते की ज्या घरात स्वच्छता असते अशा ठिकाणी महालक्ष्मीचे वास्तव्य असते. असे म्हणतात की एकादशीच्या दिवशी तीन झाडू सकाळी सकाळी कोणालाही न दिसता अंधारात एका मंदिरात नेऊन ठेवले किंवा त्यातीलच एका झाडून ने संपूर्ण मंदिर स्वच्छ करून ठेवले व ते तीनही झाडू गुप्तदान म्हणून तेथेच ठेवून दिले तर जसजशी त्या मंदिराची झाडूने सफाई होईल तसतशी आपल्या घरातील दारिद्र नकारात्मक शक्ती वाईट शक्ती दुःख त्रास बादा या हळूहळू दूर होऊ लागतील.
आपण आपल्या घरामध्ये ज्या झाडूने घर स्वच्छ करतो, तो झाडू कधीच कोणाला देऊ नये. झाडू वापरता वापरता खराब झाला असेल किंवा तुटत असेल तर तो झाडू त्वरित बदलावा जुना व खराब झालेल्या झाडू घरात कधीही स्वच्छतेसाठी वापरू नये यामुळे वास्तु दोष उत्पन्न होतो. घरातील झाडू कोणाला जर दिला तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते व निघून जाते जेवण केल्यानंतर जर कचरा सांडलेला असेल तर ते सरळ झाडूने स्वच्छ करू नये आधी ते कपड्याने स्वच्छ करावे आणि त्यानंतरच झाडूने स्वच्छ करावी नाहीतर घरात वास्तू दोष उत्पन्न होतो.
घरातील फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ जरूर टाकावे यामुळे घरातील जीवजंतू नष्ट होतात. नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही व देवी लक्ष्मीचा आपल्या घरावर आशीर्वाद राहतो परंतु अशी ही मान्यता आहे की गुरुवारी कधीही फरशी पुसू नये,नाहीतर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. जर गुरुवारी फरशी पुसणे जास्ती आवश्यकता असेल तर वर्षी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी त्यामुळे तो दोष नष्ट होतो.
झाडू कधीही मोकळ्या जागेमध्ये ठेवू नये. झाडू नेहमी कोप-यात ठेवावा. आपल्या घरातील झाडू कोणालाही दिसणार नाही , अशा पद्धतीने झाडू लपवून ठेवावा. बाहेरच्या व्यक्तीची आपल्या झाडांवर नजर पडल्यास अपशकून मानला जातो किचन मध्ये किंवा अन्नधान्याच्या जागी कधीही झाडू ठेवू नये नाहीतर आपल्या घरातील अन्नधान्याचा साठा लवकर लवकर संपत जातो तसेच अन्नधान्यात बरकत राहत नाही. झाडू कधीही खराब होऊ देऊ नये.
झाडू नेहमी स्वच्छ राहील याकडे नेहमी लक्ष राहू द्यावे. घरात नवीन झाडू आणला तर सर्वात आधी झाडूच्या मोठीला लाल रंगाचा दोरा गुंडाळून त्याचे पूजन करावे आणि त्यानंतरच झाडू चा वापर करावा यामुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर वास्तव्य करते. जर एखाद्या वेळेस लहान बालक अचानक झाडू घेऊन घर झाडू लागला तर समजून जा की आपल्या घरामध्ये पाहुणे येणार आहेत. झाडूला कधीही पाय लावू नये आणि चुकूनही जर पाय लागला तर पाया पडून क्षमा मागावी.
झाडू शरीराला लागणे देखील अपशकुन मानले जाते म्हणून चुकून जर झाडू आपल्या शरीराला लागली तर नमस्कार करावा व लगेच तोंड हात पाय धुऊन घ्यावेत. झाडू ने चुकूनही कधीही कोणाला मारू नये मग तो कोणी प्राणी असो किंवा व्यक्ती असो जर घरातून कोणी बाहेर पडले तर लगेचच घरात झाडू मारू नये. घरातून जी व्यक्ती बाहेर पडली आणि आपण लगेचच ती गेल्यानंतर घरात झाडू मारला तर जी बाहेर गेलेली व्यक्ती ज्या कामासाठी बाहेर गेलेली आहे त्या कामासाठी अडथळे येतात व त्याचे कामे पूर्ण होत नाही. घरातील व्यक्ती बाहेर गेल्यावर किमान अर्ध्या तासानंतर झाडलोट करावी.
झाडू कधीही उभा करून ठेवू नये.झाडू नेहमी आडवा करून ठेवावा त्याशिवाय दोन झाडू कधीही एकत्र ठेवू नये यामुळे घरात भांडण तंटे वाद-विवाद होत राहतात ज्यावेळी आपण नवीन घरामध्ये प्रवेश करतो त्या वेळी आपण नवीन झाडू घेऊन प्रवेश करावा जुना झाडू आपण लगेच घरामध्ये आणू नये तो आपण नंतर आणू शकतो. नवीन घरामध्ये प्रवेश करत असताना एका हातामध्ये झाडू व दुसऱ्या हातांमध्ये तुळशी घेऊन प्रवेश करावा.
नवीन घरामध्ये नवीन झाडू प्रवेश करून नेण्यास घरामध्ये सुख समृद्धी येते तसेच रात्री आपलं जेवण झाल्याच्या नंतर स्वच्छ करून झाल्यानंतर रात्री झोपायच्या वेळेस आपल्या मुख्य दाराच्या आतील भागात झाडू आडवा ठेवावा म्हणजेच झाडू आडवा ठेवून त्या झाडू च्या खाली जिऱ्याचे तीन-चार दाणे टाकावेत या उपायामुळे घरात बरकत येते. नकारात्मक शक्ती दूर होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व घरांमध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही व घर नेहमी भरलेले राहते हा उपाय अतिशय साधा सोपा उपाय आहे व तसेच सकाळी उठल्यानंतर घरामध्ये झाडू मारताना ते जिऱ्याचे दाणे घराबाहेर टाकून द्यावे त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता बाधा बाहेर पडेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.