या वीर जवानाचा आत्मा मृत्यू नंतरही करतोय देशसेवा..शासनाकडून मिळतोय रीतसर पगार..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक जवान मृत्यूनंतरही देशाची सेवा करतो आणि त्याच्या याच ड्युटीचा पगार सरकार दर महिन्याला त्याच्या खात्यावर टाकतं. हे ऐकताना जरी आच्छर्य वाटत असलं तरी अनेकांच्या मते सत्य आहे. यामागे एक कथा दडलेली आहे जी फार कमी लोकांना माहिती असेल. मृत्यूच्या ५० वर्षानंतरही हरभजन सिंग सिक्कीम सीमेवर आपली कामगिरी बजावत आहे. इतकंच नाही तर सीमेवर त्यांचे एक मंदिर सुद्धा आहे. भारतीय जवान कायम या मंदिराची स्वच्छता करतात, तिथे पूजापाठ करतात. मात्र नक्की असं काय घडलं होत ज्यावरून या गोष्टींची सुरुवात झाली. तर चला जाणून घेऊया याबद्दलची खरी कहाणी.

english.newstracklive.com

अनेक जवान आणि सीमेवरील नागरिकांच्या मते पंजाब रेजिमेंट चे जवान हरभजन सिंग यांचा आत्मा गेली ५० वर्ष सीमेवर सज्ज राहून देशाची सेवा करत आहे. सर्व त्यांना बाबा हरभजन सिंग असं म्हणतात. बरेच जणांकडून बाबा हरभजन सिंग चीनकडून होणारे हल्ले आधीच ओळखून घेतात व भारतीय सैनिकांना कळवतात. त्याचबरोबर भारतीय सैनिकांना चिनी सैनिकांची कुठलीही मुव्हमेंट आवडली नाही तर बाबा हरभजन सिंग चिनी सैनिकांना सुद्धा त्याबद्दल कल्पना देतात. हि गोष्ट ऐकणाऱ्यांना बऱ्याचदा विश्वास बसत नाही. मात्र सीमेव्वारील भारतीय जवान आणि स्वतः चिनी सैनिकांना सुद्धा बाबा हरभजन सिंग यांचा आत्मा आहे यावर खात्री आहे. यामुळेच भारत आणि चीन मिटिंग मध्ये होणाऱ्या फ्लॅग मिटींगमध्ये बाबा हरभजन सिंग यांच्या नावाने रिकामी खुर्ची ठेवण्यात येते. जेणेकरून ते देखील मिटिंग मध्ये सहभागी होऊ शकतील.

हरभजन सिंग यांचा जन्म ३० ऑगस्ट १९४६ रोजी गुजरानवाला मध्ये झाला जे आता पाकिस्तान चा एक भाग आहे. हरभजन सिंग १९६६ मध्ये २४व्या पंजाब रेजिमेंट मध्ये सैनिक म्हणून भरती झाले. भरती झाल्यानंतर केवळ २च वर्ष त्यांना देशसेवा करता आली. पुढे १९६८ मध्ये एका घटनेत त्यांचा मृत्यू झाला. नदीच्या प्रवाहात त्यांचा मृतदेह खूपच पुढे निघून गेला होता. २ दिवस सातत्याने शोधाशोध करूनही हरभजन सिंग मिळाले नाही. तेव्हा स्वतः हरभजन सिंग यांनी एका सैनिक मित्राच्या स्वप्नात येऊन त्यांचा मृतदेह कुठे आहे हे सांगितलं. आणि आच्छर्य म्हणजे त्याच ठिकाणी हरभजन सिंग यांचा मृतदेह मिळाला. पुढे अगदी सन्मानपूर्वक त्यांचे अंत्यविधी पार पडले व एका चमत्कारिक अनुभवामुळे सैनिकांनी सीमेवर त्यांचे मंदिर उभे केले. पुढे आणखी एक भव्य मंदिर बनवण्यात आलं जे कालांतराने बाबा हरभजन सिंग या नावाने ओळखलं जाऊ लागलं.

inspirock.com

हे मंदिर १३ हजार फूट उंचीवर स्थित आहे तर जुनं छोटं मंदिर १४ फूट उंचीवर आहे. बाबा हरभजन सिंग खरंच आहेत याचे अनेकदा चमत्कारिक अनुभव आले आणि या अनुभवांमुळेच बाबा हरभजन सिंग यांवरचा विश्वास कायम राहिला. असं म्हणतात कि बाबा हरभजन सिंग सुट्यांमध्ये घरी देखील जातात. बाबा हरभजन सिंग यांबद्दल सीमेवरील सैनिक सांगतात कि हरभजन सिंग मृत्यूनंतर हि ड्युटी करत आहेत. याबद्दल शासन त्यांना पगार स्वरूपात ठरविक रक्कम देतं. सीमेत त्यांची स्वतःची एक रँक सुद्धा आहे. एवढंच नाही तर काही वर्षांपूर्वी वर्षातून २ महिने त्यांना सुट्टीतून गावी पाठवण्यात यायचं. विशेष त्यांच्यासाठी एक सीट रिसर्व केली जायची. व ३ सैनिकांसोबत त्यांचं सर्व सामान गावी पाठवलं जायचं. २ महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्याच पद्धतीने सिक्कीमला परत आणलं जायचं. मात्र आता हरभजन सिंग गावी जात नाहीत. काही लोकांच्या हस्तक्षेपांमुळे हरभजन सिंग यांची सुट्टी कायमची बंद करण्यात आली.

bhaskar.com

आता ते १२ महिने २४ तास पूर्णवेळ देशाचं संरक्षण करत असतात. बाबा हरभजन सिंग यांच्या मंदिरात एक आराम खोली बनविण्यात आली आहे. जिथे सर्व सुविधा आणि झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या खोलीची नियमित स्वच्छता केली जाते. खोलीत सैनिकी शूज आणि भारतीय जवानाची वर्दी आहे. खोलीची स्वच्छता करणाऱ्या अनेकांना बाबा हरभजन सिंग असण्याची जाणीव झाली आहे. रोज हि खोली आणि पलंग आवरून सुद्धा अनेकदा बेडशीटवर कोणीतरी झोपून गेल्याच्या खुणा असतात. बेडशीट गोळा झालेलं असते, बूटांनाही अनेकदा चिखल लागलेला असतो . अर्थात या खोलीत बाबा हरभजन सिंग वास करतात अशी सर्वांची मान्यता आहे.

तर मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्की विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *