अपचन, उलटी, भयंकर पोट दुखी कायमची बंद करण्यासाठी हा रामबाण उपाय एकदा नक्की करा.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अपचन,भयंकर उलटी, पोट दुखणे याच्यावर घरच्याघरी लगेचच उपाय करा. कोणत्याही प्रकारचा हा त्रास होत असेल तर या उपायाने नक्की आराम पडेल. बरेच वेळा असे होते की ,खाण्यामध्ये काही वेगळे आले तर आपल्याला अजीर्ण होते ,अपचन होते, मळमळते उलटी होते यापासून सुटका करण्यासाठी हा उपाय जर तुम्ही केला तर लगेचच तुमचे समस्या दूर होतील.
पोट दुखणे,पोटात कळ येणे, चमका मारणे या अनेक समस्या सहजतेने निघून जाण्यास मदत होते तसेच एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि लवंग घ्यायची आहे. लवंग हे मुखशुद्धी चे काम करत असते परंतु पोटाच्या समस्या य₹ यावर सुद्धा फायदेशीर ठरते. एक ग्लास पाणी घेऊन त्याच्यामध्ये दोन लवंग घेऊन त्याचे पुढचे टोक काढून त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर एक छोटासा तुकडा दालचिनी चा घ्यायचा आहे, त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये टाकायचा आहे.
साधारणपणे एक इंचाचा तुकडा घ्यायचा आहे. ते चांगले उकळून यायचे आहे आणि नंतर एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचे आहे त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचे आहे. लाहोरी मीठ टाकायचे आहे किंवा त्याऐवजी काळा मिठाचा देखील वापर करू शकता आणि हे तयार झालेले मिश्रण ज्या लोकांना उलटी होत असेल, अजीर्ण होत असेल, अपचन होत असेल अशा व्यक्तीने पिऊन घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला प्रवासाला जायचे असेल तर आणि उलटीचा त्रास होत असेल तर हे मिश्रण एका बॉटलमध्ये भरून घ्या.
जे थर्मास चे काम करत असेल जर हे तुम्ही घरून घेऊन गेला तर वेळोवेळी याचा वापर केला तर तुम्हाला प्रवासामध्ये उलटी होणार नाही. अपचनाची समस्यादेखील होणार नाही. ज्या व्यक्तींना त्रास होत असेल त्या व्यक्तीने अर्धा ग्लास लगेच पिवून घ्यायचे आहे यामुळे अपचनाचा त्रास तर निघून जातोच पण उलटीचा देखील त्रास कमी होतो आणि प्रवासाला जाताना थर्मास चाच वापर करावा कारण त्यामुळे ते कोमट राहील. साध्या बॉटल चा वापर करू नका.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.