Altaf Raja बद्दल असं काही जे तुम्ही कधीच ऐकलं नसेल.

मित्रांनो ९० च्या दशकाबद्दल बोलताच खूप साऱ्या आठवणी मनाला ताज्या करतात. जसे रामायण,महाभारत, शक्तिमान, या सगळ्यांमध्ये एक अजून आठवण मनामध्ये येते आणि ती म्हणजे Altaf Raja ची गाणी, जी त्या वेळी रिक्षा आणि टॅक्सी ड्राइवर मध्ये खूप लोकप्रिय होती. घरून निघताना रिक्षा मधून ट्रॅव्हल करताना तुम तो टेहरे परदेशी गाणं नाही  ऐकू आल्यावर खूप विसरल्यासारखं वाटायचं.

Altaf  Raja ची गाणी त्या वेळी तरुणांच्या तुटलेल्या हृदयावर औषधाचं काम करायचे. त्या वेळी आपलं वय तर छोटं होत म्हणून आपल्याला काही समजायचं नाही पण जेव्हा आपण मोठे झालो तेव्हा Altaf Raja च्या गाण्यांवर खास प्रेम आलं.

indianexpress.com

वर्षाच्या १२ महिन्यामध्ये प्रेमिकांच्या मनोदशा चे चित्र Altaf Raja च्या गाण्यामध्ये दिसायचं. त्यांची गाणी १० ते १५ मिनिटांची असायची. पण लोक बिना स्किप करता त्यांची गाणी पूर्ण ऐकायचे. वेळ जात राहिला आणि कॅसेट इंडस्ट्री संपत आली डीव्हीडी चा जमाना आला आणि डीव्हीडी संपत आली.

आणि आता youtube चा जमाना आला. आणि याच प्रकारे Altaf rajacha आवाजही कुठेतरी हरवू लागला. त्या साल चे तरुण आता वृद्ध झाले आणि त्या काळातील लहान मुलं आता तरुण झाले आहेत. हीच ती २ पिढी आहे जी altaf rajachya गाण्यांना समजू  शकते.

Altaf Raja ने चित्रपटांसाठी खूप कमी गाणी गायली. बॉलीवूड मध्ये त्यांचंही जी काही गाणी आली ती जास्तता मिथुन दा च्या चित्रपटांसाठी असायची. बॉलीवूड मध्ये त्यांचे जेवढी गाणी आली ती सुपरहिट झाली. तरीही यांना बॉलीवूड मध्ये जास्त गाणी गायची संधी नाही मिळाली हि गोष्ट थोडीही आश्चर्यचकित करते.

Altaf Raja चा जन्म १५ अक्टोबर १९६७ ला नागपूर मध्ये झाला. त्यांचं पूर्ण नाव Altaf ibrahim mulla आहे पण गायकीमध्ये ते Altaf Raja म्हणून ओळखू जाऊ लागले. त्यांचं शिक्षण नागपूर मधेच पूर्ण झालं. नन्तर ते आई वडिलांसोबत मुंबई मध्ये आले. लहानपणापासूनच त्यांच्या घरी संगीताच वातावरण होतं . त्यांचे आई वडील दोघंही कवाली गायक होते. किशोर कुमार , रफी दा यांची गाणी ऐकूनच ते प्रेरित झाले.

१९८० चा दशक संपला आणि १९९० च्या दशकाची सुरवात झाली. १९९० मध्ये Altaf Raja चे काही गाणी आली. पण त्या वर लोकांची काही खास प्रतिक्रिया नाही आली. त्याच वरही त्यांच्या स्वतःच एक धार्मिक अल्बम “सजदा रब को करले” रिलीज झाला. १९९० पासून १९९५ च्या मध्ये खूप अल्बम आले पण त्यांना ते यश नाही मिळाले ज्यांची त्यांना गरज होती. पण नंतर काही असं झालं ज्याने Altaf Raja च भाग्य उजळलं.

freekaraoke.in

veenus कंपनी मधून रिलीज झालेला अल्बम “तुम तो टेहरे परदेशी”   या गाण्याने धुमाकूळ घातला. या अल्बम च्या त्या वेळी ४० लाख कॅसेट विकल्या गेल्या. आणि याचं नाव गिनीस बुक मध्येही नोंदवलं गेलं आहे. या गाण्याच्या यशाने Altaf Raja ला त्या काळच्या गायकांच्या मध्ये उभं करून ठेवलं. तुम तो टेहरे परदेशी च्या यशाने राजीव बब्बर ने त्यांचा चित्रपट शपथ मध्ये गायची संधी दिली.

या चित्रपटात त्यांना गाण्याबरोबर अभिनय करण्याची सुद्धा संधी दिली आहे. त्यांनतर त्यांना यश मिळतंच राहील. Altaf Raja त्यांची गाणी स्वतःच लिहितात आणि त्याची म्युसिक पण स्वतः बनवतात. हळूहळू वेळ जात राहिली आणि त्यांची गाणी कमी होत गेली.
२०१५ मध्ये Bum Gola नावाने यांचा एक अल्बम देखील आला होता आणि तमाशा चित्रपटात त्यांचं एक गाणं देखील आलं होत.

या पुढे Altaf Raja आपल्या प्रेक्षकांसाठी काय घेऊन येतील  ते त्यांनाच माहिती पण त्यांचे प्रेषक अजूनही त्यांची गाणी त्याच आवडीने ऐकतात.
आम्ही आशा करतो कि हि माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीना शेअर करायला विसरू नका.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *