तुळशीची वाळलेली काडी, करा हा दिव्य उपाय सारी राहिलेली बिघडलेली कामे होतील.

तुळशीची वाळलेली काडी, करा हा दिव्य उपाय सारी राहिलेली बिघडलेली कामे होतील.

नमस्कार मित्रांनो,

आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्व आहे. तुळशीला आपण देवीचा दर्जा देतो. म्हणून प्रत्येक हिंदूंच्या दारापुढे तुळस नक्कीच असते. तुळस आपल्या जीवनासाठी फार उपयोगी आहे. तुळस ही धार्मिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने ही खूप फायदे आहेत.

आपल्या दरातील तुळस हिरवीगार व बहरलेली असावे यासाठी आपले नेहमीच प्रयत्न चाललेले असतात. आपण सकाळी संध्याकाळी तुळशीचे पूजन करतो आणि तुळशीपुढे दिवा लागतो. दररोज तुळशीला जल अर्पण करतो. अशाप्रकारे घेता येईल तेवढी काळजी आपण आपल्या तुळशीची घेत असतो.

परंतु तरीही कधीकधी आपल्या दारातील तुळस वाळून कोरडी होऊन जाते. अशावेळी त्या तुळशीची काय करावे हे आपल्याला समजत नाही. वाळलेली तुळस दारात कधीही ठेवू नये. म्हणून जर दारातील तुळस वाळलेली असेल तर ती लगेच तेथून काढून टाकावे.

जर तुळस खाली हिरवी असेल आणि वरवर त्याच्या काड्या कोरड्या होत असतील तर तुळशीच्या कोरड्या कोरड्या काड्या अलगत काढून घ्याव्यात आणि त्या काड्या सांभाळून ठेवावे. जर संपूर्ण तुळस वाळलेली असेल तर ते तिथून काढून घ्यावी आणि त्या ठिकाणी लगेच दुसरे तुळशीचे रोप लावावे. वाळलेली तुळस कोठेही टाकू नये किंवा नदीमध्ये विसर्जित करू नये.

तुळशीच्या वाळलेल्या काड्या वेगळ्या करून त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे आणि वाळवून घ्यावे. त्यानंतर त्यांचे बारीक पावडर तयार करून घ्यावे आणि ती सुती कापडाने गाळून घ्यावे. यानंतर आपल्याला या पावडरचा वापर करायचे आहे. आपण दररोज भगवंतांचे पूजन करतो. त्यावेळी श्रीहरी विष्णु भगवंतांना आपण चंदनाचा टिळा लावतो.

त्या चंदनामध्ये तयार केलेल्या तुळशीच्या वाळलेल्या काड्यांचे पावडर मिक्स करून तो टिळा भगवंतांना लावावा. श्रीहरी विष्णू यांना तुळस अतिप्रिय आहे. तुळशीचे पान न ठेवता अर्पण केलेला नैवेद्य भगवंत स्वीकारतही नाही. इतके श्रीहरी विष्णूंच्या पूजनात तुळशीचे महत्त्व आहे.

आपण जर श्रीहरी विष्णू भगवंतांना तुळशीच्या काड्यांचे पावडर करून तो टिळा लावला तर भगवंत खूप प्रसन्न होतील आणि त्यांचा शुभ आ शी र्वा द प्राप्त होईल. भगवंत आपल्या पूजनाचा स्वीकार करतील. दररोज सकाळी भगवंताचे पूजन झाले की, घरातील सर्व सदस्यांनी या पावडरचा टिळा आपल्या कपाळावर लावावा.

यामुळे आपले मन शांत राहते आणि आपल्यामध्ये स का रा त्म क ऊर्जेचा संचार होतो, आपला आत्मविश्वास वाढीस लागतो. आपल्या कार्यात मन लागते, आपले मन एकाग्र होते. जर तुमची तुळस खूप मोठी असेल आणि तिची पावडर खूप जास्त झाली असेल तर घरातील सदस्यांनी दररोज अर्धा चमचा पावडरमध्ये अर्धा चमचा मध मिक्स करून ते औषध म्हणून घ्यावे.

यामुळे आपल्याला शारीरिक व मानसिक कोणत्याही समस्या असतील, काहीही अडचणी असतील, शरीराच्या अंतर भागामध्ये काही त्रास असेल तर ते सर्व या उपायांमुळे निघून जातील. तसेच आपल्यामध्ये काही वाईट व नकारात्मकता भरलेली असेल तर ती ही नष्ट होईल.

तसेच आपली मानसिकता बदलेल आणि मनाला एक प्रकारे शांतता मिळेल. आत्मविश्वास वाढीस लागेल, स्वतःवरील विश्वास वाढेल, आपण हे करू शकतो असे ठाम मत बनेल. तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आले असेल की, जर दारातील तुळस वाळलेली असेल तर त्या कड्यांचा काय आणि कशाप्रकारे उपयोग करावे ते.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *