चांदीची अंगठी घातल्याने काय घडते? का घालावी चांदीच्या अंगठी?
नमस्कार मित्रांनो,
आपल्याला जीवनात लवकरात लवकर धनवान व्हायचे असेल, आपल्या कुंडलीत काही ग्रह दोष असेल, आपल्याला संकटे व अडीअडचणींपासून सुटका मिळवायची असेल तर चांदीची अंगठी हाताच्या बोटामध्ये घाला आणि त्याचे फायदे स्वतः अनुभवा. आपल्याला सोन्या चांदीच्या दागिन्यांची खूप आवड आणि हौस असते.
त्यामुळे विविध आकार प्रकार व डिझाइनचे दागिने आपण नेहमी खरेदी करीत असतो आणि वापरत असतो. परंतु चांदीच्या अंगठी बोटात घातल्याने त्याचे काय फायदे होतात हे आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चांदीचे दागिने आपले सौंदर्य तर फुलवतातच. परंतु आपले भाग्यही उजळवण्याचे काम दागिने करीत असतात.
ज्योतिष शास्त्रानुसार चांदी हा धातू शुक्र व चंद्राशी संबंधित आहे शुक्र ग्रह हा सुखसमृद्धी व ऐश्वर्याचे कारक आहे. शुक्र ग्रहामुळे आपल्याला धनसंपत्ती आणि सुख समृद्धी मिळते. आपल्याला ऐश्वर्य मिळते. आणि चंद्रामुळे आपल्याला सुंदरता व शांताता मिळते, शितलता मिळते. चांदी हा धातू साधी हातो देवाधिदेव महादेवांच्या नेत्रातून प्रकट झाला असल्याने जे व्यक्ती चांदीचे दागिने धारण करतात त्यांच्यावर देवाधिदेव महादेवांचा कृपा आ शी र्वा द कायम राहतो.
चला तर जाणून घेऊया की, चांदीची अंगठी हातात घातल्याने त्याचे काय काय फायदे होतात ते. चांदीची अंगठी हातात घालण्यापूर्वी ती 24 तास दुधात, गंगेच्या पाण्यात किंवा गोमूत्रात टाकून ठेवावी म्हणजे त्यातील अशुद्धी निघून जाते आणि ती सिद्ध होऊन आपल्याला अंगठी घालण्याचे पूर्ण लाभ मिळतात. ज्योतिष शास्त्रानुसार धातू धारण केल्यास कुंडलीतील दोष नष्ट होऊ शकतात.
चांदी अत्यंत पवित्र धातू असून ज्या घरांमध्ये चांदी असते तेथे नेहमी सुखसमृद्धी आणि सकारात्मकता राहते. यामुळे देवी लक्ष्मीच्या पूजनात चांदी अवश्य ठेवली जाते. चला तर जाणून घेऊयात करंगळीमध्ये चांदीची अंगठी घातल्यास कोणकोणते फायदे होतात ते. जी व्यक्ती आर्थिक व्यवहार आणि एखादा व्यवसायाचे मालक आहेत त्यांनी आपल्या करंगळीमध्ये चांदीची अंगठी घातल्यास त्यांना त्यांच्या कार्यात यश मिळते.
पित्त आणि वाताच्या विकारांवर तसेच पचनासंबंधीच्या तक्रारींबाबत चांदीची अंगठी करंगळीमध्ये घालणे फायदेशीर ठरते. चांदी आणि इटालियन चांदी अशा दोन प्रकारात विकले जाते. इटालियन चांदीमध्ये विविध प्रकारचे नाजूक कलाकुसर करता येते. शिवाय ही अंगठी उष्णतेने काळीही पडत नाही. आकर्षक आणि चकचकीतपणामुळे ह्या अंगठ्या लक्ष वेधून घेतात.
त्यामुळे इटालियन चांदीमध्ये अंगठीला मोठी मागणी असते. आता आपण जाणून घेऊयात की, अंगठ्यात चांदीची अंगठी धारण केल्याने आपल्याला काय फायदे होतात ते. एखाद्या व्यक्तीला भाग्याची साथ मिळत नसते तर त्याने ज्योतिषी उपाय केल्यास त्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी बोटांमध्ये वेगवेगळ्या धातूंच्या अंगठ्या घातल्या जातात.
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह अशुभ असल्यास व्यक्तीला सुख सुविधा प्राप्त होऊ शकत नाही आणि पैसा नेहमी कमी राहतो. हातातल्या वेगवेगळ्या रेषा आणि पर्वतांव्यतिरिक्त प्रत्येक बोट वेगवेगळ्या ग्रहांशी संबंधित असते. यामुळे अशुभ ग्रहाचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित ग्रहाच्या बोटामध्ये अंगठी धारण केले जाते. हस्तरेषा, ज्योतिष शास्त्रानुसार अंगठ्याचा संबंध हा शुक्र ग्रहाशी आहे.
हा ग्रह विलासात म्हणजे लक्झरी लाइफ कारक आहे. आपल्याला या ग्रहामुळे ऐश्वर्य प्रधान होते. ज्या लोकांच्या कुंडलीत आणि हातामध्ये शुक्र ग्रहाशी संबंधित शुभयोग असतात ते नेहमी सुखी राहतात आणि सर्व सुख-सुविधा प्राप्त करतात. हा ग्रह अशुभ असल्यास दैनंदिन जीवनात अडचणींना सामोरे जावे लागते. आपल्या आयुष्यावर शुक्र ग्रहाचा मित्र आणि शत्रू ग्रहांच्या स्थितीचाही प्रभाव पडतो.
शनि, बुध बआणि राहू या ग्रहाचे मित्र ग्रह आहेत. हे तिन्ही ग्रह अशुभ स्थितीमध्ये असल्यास शुक्रही अशुभच फळ प्रदान करते. व्यक्तीला धन, बुद्धी आणि आरोग्याशी संबंधित अडचणींना यामुळे सामोरे जावे लागू शकते. मंगळ आणि गुरू ग्रहाची स्थिती सुद्धा शुक्राचा चांगला आणि वाईट प्रभाव बदलू शकते. सूर्य आणि चंद्र शुक्र ग्रहाचे शत्रू मानले जातात.
कुंडलीत शुक्र अशुभ असल्यास व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही. चांदी आणि प्लॅटिनम शुक्र ग्रहाचे धातू आहेत. यामुळे शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी चांदी किंवा प्लॅटिनमची अंगठी धारण करणे शुभ असते. शुक्र ग्रहामुळे जीवनात येणारी नकारात्मकता ही अंगठी दूर ठेवते. व्यक्तीसाठी स का रा त्म क ऊर्जा वाढते.
एखाद्या सोन्या-चांदीच्या दुकानातून गुरुवारी संध्याकाळी चांदीच्या अंगठी खरेदी करून घरी आणावी. घरी आल्यानंतर ती अंगठी दुधामध्ये भिजवून ठेवावी. शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करून ती अंगठी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. आपल्या देवघरात पूजन करतानाही पूजेत ही आपली अंगठी ठेवून द्यावी. पूजा झाल्यानंतर ही अंगठी आपल्या अंगठ्यात धारण करावी.
आपण एखाद्या ब्राह्मणाकडूनही चांदीची ही अंगठी अभिमंत्रित करून अंगठ्यात धारण करू शकतो. ही अंगठी शुक्रवारी धारण करावी. याच्या प्रभावामुळे जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतात आणि सर्व प्रकारच्या सुखसुविधा संपदा आपल्याला प्राप्त होतात.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.