घरात मुलगी का असावी ? नक्की पहा.
नमस्कार मित्रांनो,
आज आपला समाज इतका पुढारलेला असुनही आपण बहूतेक ठिकाणी बघतो की, मुलगी जन्माला आली तर नाके मुरडली जातात आणि मुलगा झाला की पेढे वाटले जातात.
सर्वांना अपेक्षा असते की आपल्याला एक तर मुलगा जरूर असावा. मुलगी नसली तर चालेल परंतु मुलगा हवा , वंशाला दिवा हवा. पण ती नसेल तर काही हरकत नाही असा सर्वांचाच आग्रह असतो.
पहिली मुलगी झाली तर दुसरा मुलगा व्हावा अशी अपेक्षा ठेवली जाते व गर्भधारण केला जातो. परंतु जर पहिला मुलगा झाला तर मुलीची अपेक्षा केली जात नाही. आजही मुलीला ओझे समजले जाते ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. परंतु जसे आपल्या मृत्युनंतर आपल्याला मोह, माया, ममता, राग, द्वेष या सर्वापासून सोडवण्यासाठी आपले डोके फोडण्यासाठी मुलगा असावा लागतो .
त्याप्रमाणे आपण एका मुलीला तिच्या वडिलांकडून कन्यादानात आपल्या घरात आणतो. त्या दानाची परतफेड करण्यासाठी आपल्याला कोणाला तरी कन्यादान करावे लागते आणि कन्यादान करण्यासाठी मुलगी असावीच लागते.
आपण जर इतरांकडून कन्यादान घेतलेले असेल आणि आपण त्या दानाची परतफेड केली नाही तर आपण या संसारातून मुक्त होऊच शकत नाही. पत्नीच्या रुपात आपण कन्यादान घेतो, तेव्हा कन्येच्या रुपात ते दान आपल्याला परत करावेच लागते. त्यावेळीच आपण या संसारबंधनातून मुक्त होतो.
मुलगा फक्त आपल्याच कुळाचा उद्धार करतो, परंतु मुलगी ही सासरच्या व माहेरच्या या दोन्ही कुळांचा उद्धार करते. ज्या व्यक्तींवर भगवंताची कृपा होते त्यांचाच घरात मुलीचा जन्म होतो.
असे म्हणतात की, मुलगी झाली लक्ष्मी आली. मुलगी ही लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते.
मुलगी घरात आली की, घरात आनंद, सुख, सौभाग्य व समृध्दी येते. घरातील वातावरण लगेच बदलते. मुली इतकी माया इतर कुणालाही नसते. मुलीपासून जे प्रेम आई वडिलांना मिळते ते प्रेम मुलापासून मिळूच शकत नाही. मुलगी म्हणजे वात्सल्याचा झरा असतो.
असे म्हणतात की, आपल्या पिढ्यांमध्ये जर एखादा संत महात्मा जन्माला आला तर त्याच्या मागील व पुढील एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो. काय सांगता येते आपल्या कन्येच्या गर्भातूनच एखादा संत महात्मा जन्माला आला तर आपला लगेचच उद्धार होईल.
आजकाल तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, मुले आई वडिलांना सांभाळायला नकार देतात. त्यावेळी मुलीचं आई वडिलांचा सांभाळ करतात. किंबहुना मुलांपेक्षा कितीतरी अधिक पटीने चांगल्या पद्धतीने त्या आई वडिलांना सांभाळतात. म्हातारपणाची काठी म्हणून मुले नाहीत तर मुली अगदी ताठ मानेने उभ्या राहतात.
मुलींचे आपल्या आईपेक्षा वडिलांवर थोडेसे अधिक प्रेम असते. त्याशिवाय वडिलांना प्रेमाने, लाडाने, सर्वकाही पटवून देण्याचे कामही मुलीला खूप छान प्रकारे जमते. ती आई वडिलांना रागावते, वडिलांना बोलतेही परंतु तेवढेच प्रेमही करते जे तिच्या आईलाही शक्य नसते. वडीलही मुलीच्या शब्दाबाहेर नसतात. मुलीने सांगितले आणि वडिलांनी ऐकले नाही हे कधीही शक्य नसते. अशी गोंडस लाडकी लेक सर्वांच्या घरी जरूर असावी.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.