वास्तुदोष आणि आजार याचा संबंध आहे का?
नमस्कार मित्रांनो,
आपल्या घरी वास्तुशास्त्राचे पालन केल्याने केवळ नफा मिळण्यास, समाजात मानसन्मान मिळवण्यातच नाही तर आपले आरोग्य सुद्धा चांगले राहण्यास मदत होते. जर तुमचे घर वास्तू शास्त्रानुसार बांधले गेले नाही तर घरात राहणार्या सदस्यांना जीवघेणे आजारांना सुद्धा सामना करावा लागू शकतो.
मग वास्तुदोषांचा घरात राहणाऱ्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो ते आपण आता जाणून घेऊया. तुमच्या घराच्या ईशान्य कोपर्यात शौचालय किंवा स्वयंपाक घर, जड बांधकाम किंवा मोठे झाड असल्यास कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा विविध आरोग्य समस्यांनी ग्रस्त होण्याची शक्यता असते.
त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. काही जणांच्या बाबतीत टीबी किंवा कॅन्सर देखील होऊ शकतो असं वास्तुशास्त्र सांगतं. दक्षिण पूर्व भागातील वास्तुदोषामुळे लोकांना किडनीचे आजार होऊ शकतात. दक्षिण विभागात तळघर, पाण्याची टाकी, मुख्य दरवाजा किंवा कमी उंचीचे बांधकाम असल्यास महिलांना विविध आजार होऊ शकतात.
उत्तर पश्चिम भागातील वास्तुदोषामुळे घरातील कुटुंबातील सदस्यांना विविध संसर्गजन्य रोग आणि ऋतू बदलांचे आधारसुद्धा होऊ शकतात. घराच्या दक्षिण-पश्चिम भागात काही वास्तुदोष असल्यास मालकाला हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता निर्माण होते.
त्याचप्रमाणे ईशान्य आणि दक्षिण पश्चिम झोनमध्ये वास्तुदोष असल्यास त्यामुळे पक्षाघाताचा झटका किंवा ब्रेन हॅमरेज होऊ शकते. घरातील मुलेही आजारी पडू शकतात आणि गरोदर स्त्रियांनाही गर्भधारणा झाल्यावर काही त्रास जाणवू शकतो. कधीही उत्तर दिशेकडे तोंड करून झोपू नका.
कारण त्यामुळे पचनाच्या समस्या आणि डोकेदुखी मानसिक आजार, अस्वस्थता आणि हृदयाच्या समस्या देखील होऊ शकतात. पश्चिम उत्तर पश्चिम झोनमध्ये झोपलेल्या लोकांना शारीरिक आजारापेक्षा मानसिक आजार होण्याची शक्यता असते.
अशा वास्तू दोषांवर वेळीच उपाय न केल्यास ते घरातल्या लोकांसाठी हानीकारक ठरू शकतो परिस्थिती तणावपूर्ण होऊ शकते. अभ्यास करताना किंवा काम करताना उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करा. त्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते. तुळस किंवा तुळशीची लागवड केल्यास घरातील हवा शुद्ध होते.
रबर प्लांट, कॅक्ट्स, बोन्झाय आणि इतर दुधाळ झाड लावू नका. त्यामुळे तुमचा आजार वाढू शकतो आणि तणावही वाढू शकतो. तुमच्या घराच्या ईशान्य कोपर्यात पायऱ्या किंवा शौचालय तर कधीच बांधू नका. त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतील. मुलांच्या वाढीमध्येही अडथळा निर्माण होतो.
नैऋत्य दिशेला जर मास्टर बेडरूम असेल तर शारीरिक आणि मानसिक स्थिरता येते. क्षयक कक्ष कधीही ईशान्य दिशेला बांधू नका. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. झोपताना नेहमी दक्षिण दिशेला डोकं ठेवून झोपा व हे शांत आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देत. उत्तर दिशेला डोके करून झोपणे योग्य नाही.
कारण त्यामुळे तणाव आणि वेदना वाढतात. गर्भपात होण्याची शक्यता टाळण्यासाठी गर्भवती महिलेने ईशान्य दिशेला झोपणे टाळावे. तसेच स्टोरेज स्पेस असलेल्या बेडमुळे मेंदू आणि हृदयाच्या संबंधित आजार होतात. तसंच लोखंडी पलंगावर झोपणे टाळा. साध्या लाकडी पलंगची निवड करा. तुमचा पलंग आरशासमोर ठेवू नका.
त्यामुळे वाईट स्वप्न आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तुमचा पलंग कधीही शौचालयाच्या भिंतीशी जोडलेला नसावा. कारण त्यामुळे न का रा त्म क ऊर्जा येते. चांगली झोप येण्यासाठी मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू बेडपासून दूर ठेवा. स्वयंपाक घरासाठी अग्नेय दिशा उत्तम मानले जाते.
डायनिंग रूमसाठी पूर्व दिशा सर्वोत्तम मानली जाते. कारण ते प्रभावी पचन आणि चांगलं आरोग्य वाढवत. ईशान्य दिशेला स्वयंपाक घर डिझाईन केल्याने एक गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच सगळ्यात महत्त्वाचं शौचालय आणि स्वयंपाक एकत्र बांधणे टाळा. त्या दोघांना एकमेकांपासून अंतरावर ठेवा.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.