मेहंदी लावण्याआधी हा लेख नक्की वाचा अन्यथा भोगावे लागतील हे गंभीर परिणाम.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो मेहंदी लावल्या शिवाय कोणताही शुभारंभ किंवा समारंभ पूर्ण होत नाही. लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी काढणे, हात भरून मेहंदी काढली जाते. अनेकदा पांढरे केस लपविण्यासाठी बरेच लोक मेहंदी चा वापर करतात. बरेच लोक डाय चा वापर करतात ,या डाय व कलर ला लोक खूप पसंत करत असतात. अनेकदा आपण केसांना मेहंदी लावत असतो परंतु मेहंदी लावल्यामुळे आपल्या केसांना विपरीत समस्यासुद्धा सामोरे जावे लागते म्हणूनच या लेखामध्ये आम्ही तुम्हाला मेहंदी विषयी काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
अनेकदा आपले केस अकाली पांढरे होतात आणि हे केस पांढरे करण्यासाठी आपण अनेकदा कलर व मेहंदी लावतो परंतु जर बाजारातील पदार्थ आपण लावले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या केसांना होताना दिसत असतो आणि म्हणूनच बहुतेक वेळा नैसर्गिक दृष्ट्या बनवलेली मेहंदी केसांना लावणे गुणकारी ठरते. जेव्हा आपण आपल्या केसांना हिरवी मेहंदी लावतो तेव्हा त्या मेहंदीचे आपल्या अनेक फायदे सुद्धा प्राप्त होत असतात.
बहुतेक वेळा तरी मेहंदी हिरवी असली तरी कमी कालावधीमध्ये तरंग चढावा म्हणून अनेकदा या हिरव्या मेहंदी मध्ये सुद्धा वेगवेगळे घटक प्रमाण मिसळले ले आपल्याला पाहायला मिळतात आणि या घटकांमुळे सुद्धा केसांचे आरोग्य बिघडू शकते. पी पी डी नावाचा एक रासायनिक पदार्थ असतो ते अनेकदा मेहंदी मध्ये मिसळला जातो. जर हे रसायन आपल्या त्वचेच्या संपर्कात आले तर अनेक त्वचाविकार आपल्याला होण्याची शक्यता असते.
खाज येणे, अंगावर लाल चट्टे निर्माण होणे, वारंवार अंगाला वेदना होऊ लागते तसेच सूज निर्माण होणे यासारख्या समस्या सुद्धा उद्भवत असतात. केस अजून पांढरे व्हायला लागले तरी चाले ल पण मेहंदी लावणे शक्यतो टाळावे.अनेकदा चुकीच्या पद्धतीने मेहंदी लावली तर डोळे लाल होतात त्यातून पाणी येते आणि अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या.अश्यावेळी मेहंदी अजिबात लावू नका.
जर मेहंदी केसांना लावताना चुकून आपल्या पोटामध्ये गेली तर आपल्याला पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतील. जर मेहंदी लावण्याची गरज भासल्यास तर अशावेळी नैसर्गिक मेहंदी लावण्याचा प्रयत्न करा. मेहंदीचे झाड सुद्धा आपल्या आजूबाजूला सहज प्राप्त होते तसे आयुर्वेदिक दुकानांमध्ये मेहंदीची पावडर आपल्याला उपलब्ध होते अशा वेळी ती मेहंदी ची पावडर घरी व्यवस्थित भिजवून आपण आपल्या केसांना लावू शकतो अशा प्रकारची मेहंदी लावल्याने आपल्या केसांना कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही आणि त्याच बरोबर आपल्या केसांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते.
बहुतेक वेळा आपण बाजारातून जी मेहंदी आणतो त्या मेहंदी मुळे आपले केस नरम होण्या ऐवजी दाट होतात. केसांचा रंग हळूहळू उडून जातो आणि परिणामी अकाली पांढरे पण केसांना येऊ लागते. जर तुम्हाला या समस्या भविष्यात उद्भवू नये असे वाटत असेल तर चांगल्या मेहंदीचा उपयोग अवश्य करा आणि आपल्या केसांचे आरोग्य चांगले ठेवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.