लता भगवान करे यांची खरी कहाणी.! | Lata Bhagwan Kare Biograhy

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी काल  हि संघर्ष केला आजही माझा संघर्ष सुरूच आहे आणि पुढेही माझ्या जीवन असाच संघर्ष सुरु असेल. प्रयत्नांना व्हायचे कोणतेही बंधन नसते. त्यामुळे जिंकणे चिरतरुण आहे. एक मुंगी सुद्धा प्रचंड समुद्र पार करून जाऊ शकते आणि हे सामर्थ्य तुमच्यातही आहे फक्त स्वतःला ओळखण्याचा अवकाश आहे असं सांगणाऱ्या लता भगवान करे एक संघर्षगाथा १७ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला. तर आज आपण याच लता भगवान करे यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.

relax.life

लता भगवान करे या मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील माळोना गावातल्या आहेत. राहत्या गावात उत्पन्नाचे काही  साधन नसल्या कारणाने हे कुटुंब चार वर्षांपूर्वी बारामती तालुक्यातील जळोची गावात आलं. बारामती शहरातील जळोची गावात लता करे या भाडेतत्वावर राहतात. अत्यंत हलाखीत जीवन जगणाऱ्या लता करे यांनी जराही न डगमगता आपल्या ३ मुली आणि एक मुलासह संसाराचा गाडा हाकला. या कुटुंबाने मोलमजुरी करून ३ मुलींची आणि मुलांची लग्न केली. लता करे यांचे पती भगवान करे हृदयविकाराच्या आजाराने त्रस्थ आहेत. तर मुलाचे शिक्षण गरीब परिस्थितीमुळे अपूर्ण राहिले. अपुऱ्या शिक्षणामुळे त्याला कायमस्वरूपी नोकरी मिळत नाही.

relax.life

बारामतीमध्ये दरवर्षी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमत्त शरद मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. या स्पर्धेतील एक स्पर्धक म्हणजेच लता भगवान करे नववारी साडी आणि डोक्यावर पदर आणि कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावणाऱ्या ६५ वर्षांच्या लताबाई करे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत लता करे यांनी सहभाग घेतला तो आपल्या कुटुंबासाठी. २०१३ मध्ये पती भगवान करे यांच्या उपचारासाठी त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावल्या आणि प्रथम क्रमांक  देखील पटकवला. स्पर्धेच्या एक दिवस आधी आजारी असलेल्या लताबाईंना दिसत होती ती बक्षिसाची ५००० रुपयांची रक्कम. या रकमेतून पतीच्या हृदय विकाराच्या तपासण्या करता येणं त्यांना शक्य होतं.

relax.life

यानंतर त्यांनी पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये भाग घेतला तो घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि अडीच किलोमीटर अंतर त्यांनी सहज पूर्ण केलं. केवळ एकदा तोंड नव्हे तर सलग ३ वेळा लताबाईंनी मॅरेथॉन स्पर्धा जिंकली आहे. पतीवरील उपचाराच्या खर्चासाठी अनवाणी धावून बारामतीमधील शरद मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्यानंतर लता करे या केवळ राज्यातच नाही राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीच्या झोतात आल्या. माध्यमांनी दखल घेतल्यानंतर त्यांना मदतही मिळाली. आता मात्र त्या वेगळ्या कारणांनी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ते म्हणजे त्यांच्या जीवनकथेवर आधारित लता भगवान करे मराठी चित्रपट १७ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला. एका अशिक्षित पण जिद्दी महिलेची कथा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेषकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे लता करे याच या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत. लता करे यांचे पती भगवान व मुलगा सुनील हे दोघेही चित्रपटात झळकले आहेत.

तर मित्रांनो आम्ही आशा करतो कि हि माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *