फक्त करंगळीच्या बोटावरून जाणून घ्या आपले भाग्य, नक्की पहा आणि समजून घ्या.!

फक्त करंगळीच्या बोटावरून जाणून घ्या आपले भाग्य, नक्की पहा आणि समजून घ्या.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या प्राचीन धर्म ग्रंथांमध्ये सामुद्रिक शास्त्रात व्यक्तीच्या शरीरावरील काही खाणाखुणा त्याच्या सवयी त्याच्या शरीराची ठेवण यावरून त्या व्यक्तीच्या जीवनातील कितीतरी गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे. समुद्र शास्त्रानुसार त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवन आपण सहज ओळखू शकतो. समुद्र शास्त्र मध्ये व्यक्तीचे मुख, हात, पाय सर्व अवयवांचा घडणी भरून त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवन कसे असेल याविषयी माहिती दिलेली आहे.

शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या लक्षणां बद्दल माहिती दिलेली आहे तसेच त्याचे आई-वडील आजी-आजोबा असेल तर त्यावरून ही व्यक्ती बद्दल संपूर्ण माहिती प्राचीन काळी साधुसंत एखाद्या व्यक्तीचे आचरण पाहून त्याच्या आयुष्यातील वर्तन सांगत असे. असे हे एक शास्त्र आहे की त्या शास्त्र वरून हे सर्व जाणून घेतले जात असे. आजच्या लेखामध्ये आपण आपल्या करंगळीच्या बोटावरून आपले भविष्य काय असेल याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

आपल्या हाताच्या प्रत्येक बोटाचे वेगळे महत्त्व असते, असे समुद्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे तसेच म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण आपल्या हातावरील करंगळी विषयी महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. जर तुमच्या बोटावरील शेवटचे बोट म्हणजेच करंगळी जर अनामिक पेक्षा मोठे असेल तर अशावेळी त्याचे नेमके काय अर्थ असते याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

तुम्ही जर कोणाबरोबर प्रेम केले तर तुम्ही त्या व्यक्ती त्यात संपूर्ण जग बघतात. तुम्हाला खोटे बोललेले अजिबात सहन होत नाही. तुम्ही नेहमी विचारात मग्न असता. अश्या व्यक्ती खूप चांगले असतात यांनी जर कोणाबरोबर मैत्री केली किंवा प्रेम केले तर तुम्ही ते प्रेम किंवा मैत्री खूप चांगल्या प्रकारे सांभाळता. तुम्हाला असे वाटते की तुमच्या कोणीही समजू तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्ती पासून कधीही लांब राहू शकत नाही. परंतु तुम्ही असे नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करतात अशावेळी तुम्ही त्यांच्या शिवाय सहज जगू शकतात व राहू शकतात परंतु हे प्रत्यक्षात शक्य होत नाही अशा प्रकारच्या व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्ती पासून कधीच लांब राहू शकत नाही.

ज्या व्यक्तींची करंगळी लांब असते त्या व्यक्ती फारच कष्ट करत असतात. जर अशा व्यक्तीने जर ठरवले तर काही काम करायचे आहे तर ते काम पूर्णत्वास नेण्यास नेहमी परिश्रम करत असतात. या व्यक्तींना ठेच लागण्याची खूप भीती वाटते आणि म्हणूनच अशा वेळी चालताना आपल्याला काही वस्तू लागणार नाही याची काळजी नेहमीच घेत असतात.

तसेच या प्रकारच्या व्यक्ती प्रत्येक कार्य करण्यात सावधानता बाळगत असतात. कोणत्याही कार्यामध्ये कधी अडथळा येऊ नये किंवा आपल्याला अपयश प्राप्त होऊ नये असे वाटते म्हणूनच कोणतेही कार्य करत असताना हे सावधानपूर्वक करण्यामागे या व्यक्तींचा कल असतो. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडला नाही त्या व्यक्तीच्या वागण्याची पद्धत आवडली नाही तर अशावेळी त्या व्यक्तीला तसे सरळ सरळ सांगत नाही. अशा प्रकारच्या व्यक्तींना कुणाचेही मन दुखविलेले अजिबात आवडत नाही आणि म्हणूनच या व्यक्ती सगळ्यांशी प्रेमळ व आनंदाने वागण्याचा प्रयत्न करत असतात.

ज्या व्यक्तींची करंगळी आकाराने लांब असते अशा प्रकारच्या व्यक्ती कधीच कुणाला नाही म्हणत नाही तसेच कुणाला नाही म्हणून हे त्यांच्या स्वभावामध्ये सुद्धा नसते. प्रत्येकाच्या होकारा मध्ये हो मिसळणे अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव असतो. या प्रकारच्या व्यक्तींना वाद-विवाद अजिबात आवडत नाही. त्यांना स्वप्न पाहणे नेहमी चांगले वाटते आणि म्हणून अशा प्रकारच्या व्यक्ती नेहमीच स्वप्न पाहत असतात.

जर एखाद्या व्यक्तीची करंगळी खूपच लहान आहे आणि आपल्या अनामिक या बोटाच्या रेषेखाली आहे तर अशा प्रकारची व्यक्ती खूपच मोकळ्या स्वभावाची असते आणि या व्यक्तीचे मन ही तितकेच मोकळे असते अशा प्रकारच्या व्यक्ती आपल्या मनामध्ये कोणत्याच प्रकारची गोष्ट मनामध्ये ठेवत नाही. जर करंगळी आकाराने लहान असेल अशा प्रकारच्या व्यक्ती स्वतःला नेहमी स्वतंत्र विचारांचे व बलवान विचारसरणीचे समजत असतात.

तुम्ही सहनशील स्वभावाचे असतात आणि म्हणून अशा वेळी कोणतेही कार्य मधील लबाडी व कपटीपणा तुम्हाला अजिबात आवडत नाही तसेच प्रत्येक कार्य हे मनापासून करणे हेच तुमचे ध्येय असते. अशा प्रकारचे व्यक्तीने जर एखाद्या व्यक्ती सोबत संबंध निर्माण केले तर त्या व्यक्तीबद्दल त्यांना नेहमीच आकर्षण वाटत असते आणि त्यांच्याशी जोडले नाते संबंध कशा पद्धतीने टिकवता येईल याचा विचार सुद्धा ही व्यक्ती करत असते.

या व्यक्तींना खोटे लबाड व कपटीपणा करणारे व्यक्ती अजिबात आवडत नाही तसेच कोणतेही कार्य मधील लबाडी कपटीपणा करणारे व्यक्ती सुद्धा जवळपास असले तरी यांची चिडचिड होते आणि म्हणूनच यांचा स्वभाव जरी मोकळा असला तरी त्यांच्या स्वभावाला काहीतरी बंधने नक्कीच आहे. ज्या व्यक्तीची करंगळी आकाराने लहान असते अशा प्रकारच्या काही काही व्यक्ती सहनशील अजिबात नसतात म्हणूनच या व्यक्तींना लवकर राग चिडचिड येत असतो आणि म्हणूनच अशा प्रकारच्या व्यक्ती जास्त लोकांना आवडत सुद्धा नाही कारण की या प्रकारच्या व्यक्ती अतिशय स्पष्टवक्तेपणा संबंध ठेवणाऱ्या असतात.

या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तर त्यावर नेहमीच जगत असतात तसेच प्रत्येक गोष्ट त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत असतात. आपल्या वागण्यामुळे जर कुणाला वाईट वाटले तर अशा वागण्यामुळे या प्रकारच्या व्यक्तींना खूपच लाजीरवाणी भावना मनामध्ये जगत असते आणि म्हणूनच या व्यक्ती आपले वागणे सुधारण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.