एक ग्लास पाण्यात हा पदार्थ टाकून प्या; शरीरातील उष्णता लगेचच होईल कमी.!

एक ग्लास पाण्यात हा पदार्थ टाकून प्या; शरीरातील उष्णता लगेचच होईल कमी.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याचा ऋतू हा उन्हाळ्याचा ऋतू आहे आणि या ऋतूमध्ये आपल्याला उष्णता खूप मोठ्या प्रमाणावर जाणवू लागते आणि घराच्या बाहेर पडल्यावर रस्त्यावर आपल्याला कलिंगड ची गाडी हमखास पाहायला मिळते आणि आपण हे कलिंगड घरी आणून सेवन करत असतो तसे पाहायला गेले तर प्रत्येक ऋतूमध्ये जे फळ उपलब्ध असते ते फळ खाणे म्हणजे आपल्या शरीरासाठी वरदान ठरत असते म्हणूनच उष्णतेपासून आपल्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी आज आपण एक प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपण कलिंगड या फळाचा उपयोग करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला या कलिंगड चे काही तुकडे करून त्याचा रस बनवायचा आहे. कलिंगड मध्ये अनेक असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीराला शीतलता प्राप्त होते त्याचबरोबर शरीरातील पित्त, कफवर्धक तसेच ज्या व्यक्तींना लघवी स्वच्छ होत नाही अशा व्यक्तींना कलिंगड उपयुक्त ठरते त्याचबरोबर लघवीच्या ठिकाणी होणारी जळजळ सुद्धा कलिंगड मुळे कमी असते त्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपण दुसरा पदार्थ वापरणार आहोत या पदार्थाचे नाव आहे खडीसाखर.

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खडीसाखरेचे उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर केलेला आहे त्याचबरोबर आपण आणि घरगुती उपचारांमध्ये खडीसाखरेचे उपयोग करत असतो कारण की यामध्ये शरीराला थंडावा प्राप्त करणारे असे महत्त्वाचे गुण उपलब्ध असतात. त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी जिरे लागणार आहे. आपल्याला जिऱ्याची पावडर करायचे आहे. जिरे हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे आणि त्याचबरोबर स्वयंपाक घरामध्ये सुद्धा जिरे महत्त्वाची भूमिका बजावते.

आपण जेवण बनवत असताना प्रत्येक पदार्थामध्ये जिऱ्याचा उपयोग करत असतो म्हणून हा उपयोग करत असताना सुद्धा आपल्याला जिऱ्याचा उपयोग करायचा आहे त्यानंतर आपल्याला खडीसाखर ची बारीक पावडर करून घ्यायची आहे. आपण जो कलिंगड चा रस बनवलेला आहे त्यामध्ये थोडीशी जिऱ्याची पावडर व थोडीशी खडीसाखर पावडर मिक्स करायचे आहे आणि या रसाचे सेवन करायचे आहे.

यामुळे आपल्या शरीरातील उष्णता लवकर कमी होणार आहे त्याच बरोबर आपल्याला लघवी करताना जो काही त्रास होणार आहे तो सुद्धा कमी होतो म्हणूनच आपल्या शरीरातील संपूर्ण उष्णता बाहेर काढण्यासाठी हा रस तुम्हाला मदत करत असतो म्हणून या रसाचे सेवन अवश्य करा आणि उष्णतेपासून स्वतःच्या शरीराचे संरक्षण करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.