जीवनातील सर्व त्रास संपवणारा हा उपाय एकदा शनिवारी नक्की करा.!

जीवनातील सर्व त्रास संपवणारा हा उपाय एकदा शनिवारी नक्की करा.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आठवड्यातील प्रत्येक दिवसाला हिंदू धर्मशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे.प्रत्येक दिवस हिंदू धर्मशास्त्रानुसार एखाद्या देवाला किंवा देवीला समर्पित केलेला असतो. शनिवार हा शनी देवाचा दिवस आहे. या दिवशी शनि देवाची पूजा करण्याचा नियम आहे. सूर्यपुत्र शनिदेव यांना न्यायाचे देव मानले जाते. शनिदेव आपल्याला आपल्या कर्तृत्वाच्या आधारे फळ प्रदान करत असतात. अशा परिस्थितीमध्ये आम्ही या लेखामध्ये शनिवारच्या या विशेष दिवशी नेमके कोण कोणते उपाय करायचे आहेत याबद्दल सांगणार आहोत,चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.

जर शनिवारी तुम्ही हे उपाय केल्यास तुमच्या जीवनातील सर्व दुःख,व्यथा, त्रास नष्ट होतील. सर्वात पहिला उपाय आहे तो मोहरीच्या तेलाचा उपाय. काचे पासून बनलेल्या वाटीमध्ये मोहरीचे तेल संपूर्ण आणि भरावे आणि आता त्या वाटीमध्ये आपली चेहऱ्याची सावली पडेल अशा पद्धतीने उभे रहावे आणि ओम शं शनेश्वराय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे. त्यानंतर शनि मंदिराच्या बाहेर बसलेल्या गरजू व्यक्तींना हे तेल आपल्याला दान करायचे आहे.

हा उपाय आपल्याला सलग सात दिवस करायचा आहे. यावेळी आपल्या सर्व दुःखांवर विजय मिळावा आणि आपले सर्व दुःख नष्ट व्हावे अशी श्री शनिदेव यांना प्रार्थना सुद्धा करावी तसेच आपल्यावर शनि देव याची कृपादृष्टी रहावी तसेच आपल्या सर्व चुकांबद्दल क्षमा सुद्धा मागावी. पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारणे.शनी देवाचा दोष व साडेसाती दूर करायची असल्यास पिंपळाच्या झाडाला शनिवारच्या दिवशी फेऱ्या मारणे शुभ मानले गेलेले आहे.

असे केल्याने शनिदेवाचा जो दोष आहे त्यांची पीडा कमी होते आणि लवकरात लवकर आपल्या या दोषातून मुक्तता मिळते. हा उपाय करताना आपल्याला शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान विधी आटोपल्यानंतर काळे कपडे घालून पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपल्याला फेर्‍या मारायचे आहेत.या फेर्‍या मारताना तुम्ही शनिदेवांचा मंत्राचा जप सुद्धा करू शकता.

असे केल्यामुळे तुमच्या जीवनातील शनिपीडा शनी दोष लवकर संपेल आणि शनी देव यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल
त्यानंतर महत्त्वाचा उपाय म्हणजे हनुमान चालीसा. हनुमान चालीसा यास हिंदू धर्म शास्त्रामध्ये अनन्य असे महत्व प्राप्त आहे त्याचबरोबर शनिवारचा दिवस हा हनुमान यांचा दिवस सुद्धा मानला जातो.

त्याच बरोबर हनुमान व शनिदेव यांच्यात मैत्रीचे नाते असल्यामुळे जर तुम्ही शनिवारच्या दिवशी शनिदेव यांच्या पूजा करताना भगवान हनुमान यांच्या चालीसाचे पठण केल्यास तुमच्या जीवनातील जे काही दुःख त्रास समस्या असतात त्या लवकर संपून जातात. तसेच शनिवारच्या दिवशी मुंग्यांना पीठ व माशांना धान्य खाऊ घाल ने शुभ मानले जाते. याद्वारे कर्जातून मुक्ती व कामामध्ये बढती मिळण्याची लाभ होतात.

काळे वस्तूचे दान करणे.काळी उडीद, काळे कपडे,काळे हरभरे तसेच काळे तीळ या वस्तूंचे शनिवारी दान करणे शुभ मानले गेले आहे. या सर्व वस्तू जर तुम्ही गरजू व्यक्तींना दिल्यास तुमचा शत्रू तुमच्यावर कधीच विजय मिळू शकत नाही त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी श्री शनिदेव यांना तेल अर्पण करावे त्याचबरोबर शनि देव यांच्या कृपा आशीर्वादामुळे तुमची जीवन सुखमय होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.