हरभऱ्याच्या कोवळ्या पानांचे हे भन्नाट फायदे; या आजारांपासून करेल कायमची सुटका.!

हरभऱ्याच्या कोवळ्या पानांचे हे भन्नाट फायदे; या आजारांपासून करेल कायमची सुटका.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्याला शेतीमध्ये हरभरा पाहायला मिळतो. हा हरभरा अत्यंत गुणकारी असा आहे ,हरभऱ्याची पाने खुडून त्याची भाजी सुद्धा बनवली जाते. या हरभऱ्याची पाने उन्हामध्ये ठेवून त्याची साठवणूक सुद्धा केली जाते.अन्नाला चव येण्यासाठी या पानांचा वापर केला जातो.

ग्रामीण भागामध्ये या भाजीची वाढवण्यासाठी अनेकदा खाद्यपदार्थांमध्ये वापर केला जातो परंतु हे असून सुद्धा अनेकांना या हरभऱ्याच्या भाजीचे औषधी गुणधर्म माहिती नसतात. हरभऱ्याची भाजी संधिवात असणाऱ्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरते. सांधे दुखणे, सांध्यांना सूज येणे, गुडघ्या मधील वाटीतील तेल कमी होणे, इत्यादी समस्यांवर हरभरा महत्त्वपूर्ण ठरतो.

ही समस्या दूर करण्यासाठी हरभऱ्याची पाने पाने गरम पाण्यामध्ये उकळून घ्यावी त्यानंतर या पाण्याचा लेप तयार करावा आणि वेदना असलेल्या भागावर लावा. हरभऱ्याची पाने थंड चवीला तुरट व आंबट असतात शिवाय ज्या व्यक्तींना भूक लागत नाही, जेवण जात नाही अशा व्यक्तींसाठी हरभऱ्याची पाने गुणकारी ठरतात.

फुले तयार होण्याच्या वेळी या पानांवर एक आम्ल तयार होत असते त्याचबरोबर पहाटे या पानांवर दव पडते अशावेळी या हरभऱ्याच्या झाडा वर एक कापड टाकून ठेवा. एकदा का दव पडल्यामुळे कापड ओले झाल्यास नंतर ते कापड एका भांड्यामध्ये पिळुन घ्या.

मग जे ऍसिड निघेल ते एका बॉटलमध्ये भरून ठेवा यामध्ये मॉलीक ऍ सिड व ऑक्सिलीक ॲ सिड असते, यातील मुळे ज्या व्यक्तींना भूक लागत नाही त्यांच्याकरिता हे आम्लं गुणकारी आणि लाभदायक ठरते.

अनेकदा शरीरामध्ये लोहाची कमतरता जाणवत असते, अशावेळी हरभऱ्याच्या पाना सोबत मध खाल्ल्याने तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते. याबरोबर याच्या पानांची भाजी खाल्ल्याने पोट साफ न होणे अपचन, छातीमध्ये जळजळ होणे यासारख्या समस्या त्वरीत दूर होतात म्हणूनच हरभरा हा खऱ्या अर्थाने आपल्या आरोग्यासाठी रामबाण औषध ठरतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.