निरमा पावडर वरील या मुलीची मन हेलावून टाकणारी गोष्ट समजल्यावर तुम्हाला धक्काच बसेल..!

निरमा पावडर वरील या मुलीची मन हेलावून टाकणारी गोष्ट समजल्यावर तुम्हाला धक्काच बसेल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो 90 च्या दशकात लोकांचे लक्ष फक्त एकफह चॅनेल वर अडकलेले होते. काही ठराविक कार्यक्रम आणि जाहिराती पाहून सुद्धा भारतीय लोक आनंदी होत होते. आजही त्या काळातील गोष्टी ती पिढी कधीच विसरू शकणार नाहीत.

90 च्या दशकातील जाहिरातींबाबत बोलताना निरमा वॉशिंग पावडर तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीत. निरमा वॉशिंग पावडर चे गाणं आजही लोकांच्या ओठांवरती येत. त्यावेळी धुण्याची पावडर म्हणजे निरमा असा सर्वांनी समज करून घेतला होता इतका हा ब्रँड मोठा झाला होता. वॉशिंग पावडर निरमा चे गाणे तेव्हाही लोकं पुटपुटत होते आणि आजही ते लोकांच्या स्मरणार्थ आहे.

तुमच्या लक्षात आले असेल निरमा पावडर च्या पॅकेट वर पांढरा फ्रॉक घातलेली एक मुलगी आहे. पण ही मुलगी नेमकी कोण हे जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केलात का..? काय आहे त्यामागची स्टोरी.? अडचणींचा सामना करत  एक साधा माणूस कसा झाला इतका यशस्वी.? तर आज आपण याच बद्दल जाणून घेणार आहोत.

1969 मध्ये गुजरातचे कर्जन भाई यांनी वॉशिंग पावडर बनवायला सुरुवात केली. कर्जन भाई यांची एक मुलगी होती जिच्यावर ते जीवापाड प्रेम करायचे. त्यांच्या मुलीचे नाव निरुपमा होतं पण कर्जन भाई तिला लाडाने निरमा बोलायचे. कर्जन भाई त्यांच्या मुलीला नजरेपासून दूर जाऊ देत नव्हते पण नशीबापुढे कोणाचे काही चालत नाही हेच खरे.. एकदिवस कुठेतरी जात असताना निरुपमाचे अपघातात निधन झाले. कर्जन भाईंना या धक्क्यातून सावरण्यास वेळ लागला.

कर्जन भाईंची इच्छा होती की निरमा ने मोठे होऊन नाव कमवावे. पण तिच्या अकाली निधनाने त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. पण त्यांनी निरमा ला अमर करण्याचा दृढ निश्चय केला. त्यामुळे त्यांनी निरमा पावडर ची निर्मिती सुरू केली आणि पॅकेटवर निरमा चा फोटो लावला.

पण हा प्रवास इतका सोप्पा नव्हता कारण त्या काळात मार्केटमध्ये Surf सारख्या पावडर चा दबदबा होता. त्याकाळी सर्फ ची किंमत 15 रुपये किलो इतकी होती. कर्जन भाई फक्त साडेतीन रुपये किलोने निरमा पावडर ची निर्मिती करत होते. कमी उत्पन्न असणाऱ्यांना निरमा हा चांगला पर्याय वाटला आणि त्यानंतर लोकं निरमा ला ओळखू लागले.

कर्जन भाई सरकारी नोकरी करत होते. रोज सायकलने ऑफिस ला जाताना लोकांच्या घरी निरमा पावडर ची विक्री करत होते. त्याकाळी निरमा ला अहमदाबाद मध्ये चांगली पसंती मिळत होती. कर्जन भाईंनी तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर या वॉशिंग पावडर चा फॉर्म्युला तयार केला. याला बनवण्यापासून ते विकण्या पर्यंतचे काम कर्जन भाई स्वतः करत होते. काही काळानंतर त्यांनी आपल्या नोकरीवर पाणी सोडले आणि निरमा वर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं.

त्यांनी निरमा साठी टीम तयार केली. ही टीम जवळपासच्या दुकानांवर जाऊन विक्री करत असत. सुरुवातीला त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला. कारण कर्जन भाईंकडून उधारीवर माल घेणाऱ्या दुकांदारांकडे पैशांची मागणी केल्यावर दुकानदार कारणे सांगून टाळाटाळ करत होते, यामुळे कर्जन भाईंना तोटा सहन करावा लागत होता.

एके दिवशी त्यांनी संपूर्ण टीमला सांगून मार्केट मधून सर्व निरमा पॅकेट परत मागवले. टीम ला वाटले की कर्जन भाईंनी हार मानली आणि निरमा आता लवकरच बंद होणार आहे. पण कर्जन भाईंच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना होती. त्यांनी निरमाचा जाहिरात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर निरमा पावडर ची जाहिरात शानदार जिंगल सोबत टीव्हीवर झळकण्यास सुरुवात झाली. निरमा ने एकाच रात्रीत सर्वांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले. वॉशिंग पावडर निरमा हे गाणे लोकांच्या ओठांवर येऊ लागले. आणि आता गुजरातच्या अहमदाबाद मधेच नाही तर पूर्ण देशात स्वतःची ओळख निर्माण केली.

आता कर्जन भाई आपल्या मागील चुकांपासून शिकले होते. त्यांनी उधारीवर माल देने बंद केले, हळूहळू त्यांचा सिक्रेट फॉर्म्युला हिट झाला आणि त्यांचे यश आता सर्वांसमोर आले आहे. आजही वॉशिंग पावडर निरमा हे गीत लोकांच्या ओठांवर आहे. अखेर कर्जन भाईंनी निरमा म्हणजेच त्यांच्या मुलीला अमर बनवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *