तुमच्या घरातल्या कॅलेंडरची दिशा बदला.. घरात खूप पैसा येईल आणि नशीबही देईल साथ..!

तुमच्या घरातल्या कॅलेंडरची दिशा बदला.. घरात खूप पैसा येईल आणि नशीबही देईल साथ..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कि आपल्या घरातील कॅलेंडर हे कोणत्या दिशेस लावायला हवं. आपल्या घरामध्ये दोन महत्वाच्या वस्तू आहेत. पहिलं म्हणजे आपल्या घरातील घड्याळ आणि दुसरी वस्तू म्हणजे आपल्या घरातील कॅलेंडर. मित्रांनो आपला दिवस आणि आपली वेळ कशी जाणार हे ठरवण्याचं काम या दोन वस्तू ठरवतात आणि म्हणूनच आपला दिवस आणि आपली वेळ या दोन्ही गोष्टी शुभक घडायच्या असतील तर आपण या दोन गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं.

कॅलेंडर घरात लावताना ते सर्वात प्रथम कोणत्या दिशेने लावू नये हे आपण जाणून घेऊया. आपल्या घराकडची जी दक्षिणेकडची भिंत आहे त्या भिंतीवर चुकूनही कॅलेंडर लावू नये. याच कारण असे आहे कि दक्षिण दिशा हि मृत्यूची दिशा समजली जाते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते. मृत्यूची देवता यम यांची दिशा म्हणजे दक्षिण दिशा.

आणि म्हणून ज्यावेळी तुम्ही दक्षिण दिशेला कॅलेंडर लावता त्या त्या वेळी घरामध्ये अत्यंत अशुभ प्रकारच्या घटना घडू लागतात. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होत नाही. वारंवार पैशाच्या अडचणी उभ्या राहतात. म्हणून हि दिशा कॅलेंडर लावण्यासाठी अयोग्य आहे ती दिशा आपण टाळायला हवी.

मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे काहीजण दरवाज्याच्या पाठीमागे किंवा पुढे कॅलेंडर लावतात. दरवाज्याच्या मागेही लावू नका आणि पुढेही लावू नका. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत कारण ज्या ज्या काही गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्या या दरवाज्यातूनच येत असतात आणि म्हणूनच या ठिकाणी आपली वेळ किंवा आपला जो काही दिवस आहे तो त्या ठिकाणी असायला नको.

आता आपण हे जाणून घेऊया कि कॅलेंडर लावायचं तरी कुठे..?

मित्रांनो सर्वात चांगली जी दिशा आहे ती तुमच्या गरजेनुसार तुम्ही ठरवा. तुमच्या घरामध्ये पैशाची तंगी असेल पैसे येत नसेल उद्योग व्यवसाय चालत नसेल घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होत नसेल तर घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावणं हे अत्यंत उत्तम असेल. दिनदर्शिका आपण त्या ठिकाणी लावू शकता.

दुसरी गोष्ट जर तुमच्या घरामध्ये पैसा तर खूप येतोय पण तो टिकत नाहीय म्हणजेच सेव्हिंग होत नाहीय , पैसे वाचवला जात नाहीय, पैशाची उधळ पट्टी होते , पैसा विनाकारण खर्च होतो तर अशावेळी आपल्या घरातील जी पश्चिम दिशेची जी भिंत आहे त्या ठिकाणी आपण कॅलेंडर लावा त्यामुळे आपली बचत वाढते , आलेला पैसे टिकून राहतो तो विनाकारण वेगवेगळ्या गोष्टींवर खर्च होत नाही.

अजून एक गोष्ट कि ज्या ज्या वेळी तुम्ही कॅलेंडर मध्ये तारीख पाहाल त्या त्या वेळी आपला चेहरा दक्षिण दिशेला नसेल याची आपण काळजी घ्यायला हवी.काही लोक जे सामाजिक कार्यामध्ये आहेत , सामाजिक काम करतात , समजला उपयोगी पडेल अशाप्रकारची काम करतात अशा लोकांना आपल्या कामामध्ये प्रगती साध्य करण्यासाठी जी पूर्व दिशा आहे त्या पूर्व दिशेला कॅलेंडर लावायला हवं. किंवा ज्या घरामध्ये वारंवार लोक आजारी पडतात, आरोग्य ठीक राहत नाही अशा लोकांनी पूर्वेकडच्या दिशेला जर कॅलेंडर लावलं तर त्यांना त्यातून निश्चित फायदा मिळू शकतो.

जर तुम्ही ऑफिस मध्ये किंवा अशा ठिकाणी नोकरी करताय आणि नोकरी मध्ये प्रमोशन मिळत नाहीयत किंवा नवीन संधी प्राप्त होत नाहीय तर त्यासाठी उत्तर दिशा हि उत्तम आहे. कॅलेंडर खरेदी करताना काही गोष्टींचं आपण पालन करा. पहिली गोष्ट अशी कि कॅलेंडर वर जी चित्र असतात ती जंगली प्राण्यांची किंवा हिंस प्राण्यांची नसावीत कारण अशा प्रकारचे प्राणी जेव्हा आपण घरी लावतो तेव्हा त्यामुळे एक प्रकारची नकारत्मक ऊर्जा तयार होते , घरातील लोक छोट्या छोट्या कारंणावरून भांडू लागतात.

काही कॅलेंडर मध्ये उदास चेहरे असणारी लोक किंवा रडणारे लोक असं चित्र त्या ठिकाणी दाखवलं जात तर अशा प्रकारची चित्र आहेत ती सुद्धा नकोत कारण त्यामुळे सुद्धा घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरामध्ये सतत चिंतेचं वातावरण निर्माण होत व एक प्रकारचा तणाव घरामध्ये राहतो.

तर मित्रांनो या गोष्टींचं आपण पालन केलं तर आपल्याला सुद्धा दिसेल कि आपल्या घरातील कॅलेंडर हे आपणास सकारत्मक फळ देत आहे तसेच दिवस हा शुभ जात आहे. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *