ज्या पुरुषांच्या छातीवर जास्त केस असतात त्यांनी हि माहिती एकदा नक्की वाचा..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो सामुद्रिक शास्त्र हे एक असे शास्त्र आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या शरीरावरुन त्याचा स्वभाव ओळखता येतो. व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, त्याच्यामध्ये गुण आणि दोष कोणकोणते असतील तसेच या व्यक्तीच भविष्य कसं असणार आहे हि सर्व माहिती आपल्याला केवळ व्यक्तीच्या शरीराकडे पाहून सामुद्रिक शास्त्र सांगू शकत.

मित्रांनो आज आपण एखाद्या व्यक्तीच्या, खास करून पुरुषांच्या छातीवर जर केस असतील तर असे पुरुष स्वभावाने कसे असतात, त्यांचं भविष्य कसं असत या बद्दल आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो सामुद्रिक शास्त्र असं मानत कि ज्या पुरुषांच्या छातीवर जास्त केस असतात असे पुरुष हे बलशाली असतात, अशा पुरुषांमध्ये खूप ताकद असते. जरी ते दिसायला किरकोळ असले तरीसुद्धा त्यांच्यामधील ताकदीचा अंदाज आपण बांधू शकत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे हे व्यक्ती समाधानी असतात. त्यांच्याकडे मुबलक पैसा असतो आणि पैसा कमी असला तरी या व्यक्ती आहे त्यामध्ये समाधान मानणारे असतात. हे लोक खूप पैशांच्या मागे धावत नाहीत. या व्यक्तींनी मनात आणलं तर ते पैसे कमावण्याचे एकापेक्षा जास्त स्रोत ते शोधू शकतात. एकापेक्षा जास्त मार्गांनी हे पैसा कमवून श्रीमंत होऊ शकतात. या लोकांमध्ये ती क्षमता असते आणि ते जे काही कमवतात त्यामध्ये समाधानी राहतात आणि त्यांना संतुष्ट ठेवतात.
मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट अशी सांगता येईल कि सुख सुविधांच्या पाठी हे कधीच धावत नाहीत. हे हवं, ते हवं अशा अपेक्षा ते कधीच कोणाकडून करत नाहीत. मित्रांनो यांचं शरीर मजबूत आणि बलिष्ठ असतं. मात्र एक वाईट सवय यांना अशी असते कि कोणत्याही वाईट सवयी यांना लवकर लागतात. विशेषतः व्यसनाधीन हे फार लवकर होतात आणि आपलं शरीर हे बरबाद करून घेतात. 

मित्रांनो ज्या व्यक्तींच्या शरीरावर केस असतील त्यांनी हि गोष्ट अगदी काळजीपूर्वक लक्षात ठेवा कि आपण व्यसनांच्या मागे वा वाईट संगतीच्या मागे कधीही पडू नका. अजून एक दोष यामध्ये सांगता येईल कि आपल्या नशिबात जेवढं लिहिलेलं आहे ते त्यांना नक्की मिळतं. मात्र कधीकधी जास्त पैशांची हाव वाईट संगतीमुळे या लोकांना लागू शकते. आणि मग कमी कालावधीत जास्त पैसा मिळवण्याच्या चक्कर मध्ये ते अडचणीत येऊ शकतात. मित्रांनो या लोकांवर जास्त लोकं भरोसा ठेवत नाहीत, लोकांना यांचा विश्वास वाटत नाही. अशामध्ये या लोकांनी दुसऱ्याचं मन जिंकून घेण्याची कला हस्तगत करायला हवी.
तर मित्रांनो सामुद्रिक शास्त्रानुसार ज्यांच्या छातीवर केस असतात अशा पुरुषांचा स्वभाव आपण पहिला. हे जे लोक असतात ते आपल्या मनातील गोष्टी असतात ते शक्यतो शेअर करत नाहीत. दुसऱ्याच्या मनातील गोष्ट अगदी सहज काढून घेतील मात्र आपल्या मनातील ज्या गोष्टी आहेत त्या मात्र गुप्त ठेवण्याची कला अशा लोकांमध्ये जन्मताच असते.

तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्कीच विसरू नका. 

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.