कच्ची केळी खाण्याचे हे गुणकारी फायदे तुम्हाला माहिती आहेत का..?

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण नेहमी पिकलेली केळी खात असतो, ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. पण जर आपण कच्ची केळी खात असाल तर त्याचा सुद्धा आपल्या शरीराला खूप मोठा फायदा होतो. त्याच्यामुळे खूप सारे रोग आपल्याला होत नाहीत. यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन क, व्हिटॅमिन इ हे भरपूर प्रमाणात असतं आणि त्याचाच आपल्या शरीराला खूप मोठा फायदा होतो. आपल्याला शरद,पडसा खोकला हे रोग सहजासहजी होत नाहीत. त्याच्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढते.

maharishiayurvedaindia.com

ज्यांना अन्न पचनाचा प्रॉब्लेम आहे, ज्यांचं अन्न व्यवस्थितपणे पचत नाही, अशांनी सकाळी उठल्यावर एक तरी कच्च केळ नक्की खावं. केळ खाल्ल्यांनंतर आपलं पोट व्यवस्थितपणे काम करू लागतं आणि त्याची कार्यप्रणाली सुधारते ज्यामुळे आपलं अन्न पचू लागतं. ज्यांना कब्ज चा प्रॉब्लेम आहे, पोट व्यवस्थितपणे साफ होत नाही त्यांनी रात्री झोपताना एक कच्च केळ खाल्लं पाहिजे. असं केल्याने सकाळी त्यांचं पोट व्यवस्थितपणे साफ होईल.

30dayfitness.app

ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे तसेच हिमोग्लोबिन ची कमतरता आहे त्यांनी सुद्धा सकाळी उठल्यानंतर २ केळी आवर्जून खावी. कच्ची केळी खाल्ल्याने सुद्धा आपल्या शरीरात रक्त वाढत आणि शरीरामध्ये जे द्रव्य कमी पडलेले असतात ते द्रव्य वाढवण्याचे काम सुद्धा कच्च केळ करते. ज्यांच्या शरीरात फॅट (चरबी) जास्त आहे त्यांनी सुद्धा आहारामध्ये कच्च्या केळ्याचा समावेश करावा. फॅट बर्न करण्याचं काम सुद्धा कच्ची केळी करतात. कारण आपल्या शरीरामध्ये फॅट वाढलं तर शरीरामध्ये ब्लॉकेज तयार होतात आणि हेच ब्लॉकेज आपल्याला भविष्यामध्ये हृदय विकार आणू शकतात. त्यामुळे आपण जेवढं फिट राहू तेवढं खूप महत्वाचं आहे.त्याच्यामुळे आपलं हृदय सुद्धा तंदुरुस्त राहतं. जी लोकं कच्ची केळी खातात त्यांच्या शरीरात सहजासहजी ब्लॉकेज तयार होत नाही.

medicalnewstoday.com

यामध्ये पोट्याशियम जास्त असल्याने आपली हाडे सुद्धा मजबूत होतात. ज्यांची डोळ्यांची नजर कमी आहे त्यांनी कच्च्या केळ्यांचा आहारामध्ये समावेश करावा. पिकलेली केळी खाल्याने सुद्धा डोळ्यांची नजर कमी असलेली दूर होते.

त्वचा कोरडी पडलेली असेल तर कच्च्या केळ्याची जी साल असते म्हणजेच कच्च्या केळ्याचा जो रस असतो तो जरी लावला तरी ३ ते  ४ दिवसामध्ये त्वचा कोरडी पडण्याची समस्या निघून जाईल. मित्रांनो कच्ची केळी खाण्याचे फायदे जर का तुम्हाला आवडले असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना सुद्धा शेअर करा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.