देवघरात दिवा लावताना दिव्यात टाका ही 1 वस्तू घरात त्यामुळे आजारपण नावालाही उरणार नाही.

मित्रांनो देवपूजा करताना जो दिवा आपण प्रज्वलीत करतो त्या दिव्यामध्ये टाका एक छोटीशी वस्तू. हि वस्तू टाकल्याने आपल्या घरातील आजारपण कायमचं निघून जाईल. तुमच्या घरामध्ये व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील , जर तुमच्या घरामध्ये सुखशांती राहिलेली नसेल वारंवार वादविवाद जर होत असतील तर मित्रानो हि एक छोटीशी वस्तू जर आपण दिव्यामध्ये टाकली तर तुमच्या घरामध्ये सुखशांती नांदू लागेल, आजारपण कायमच निघून जाईल, अशी कोणती वस्तू आहे हे आपण जाणून घेणारच आहोत पण त्या आधी आपण देवपूजा करताना जो दिवा वापरतोय त्या संबंधी काही महत्वाच्या गोष्टींचं पालन नक्की केलं पाहिजे

पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या देवपूजेमध्ये दिवा हा लावायलाच हवा. याच कारण असं आहे कि असं म्हणतात कि दिवा जो प्रकाशाचं प्रतिनिधित्व करतो, प्रकाश हा आपल्याला अंधाराकडून उजेडाकडे घेऊन जातो. ज्ञानाचं प्रतीक म्हणजे दिवा आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अज्ञानरूपी जो अंधार आहे तो जर का घालवायचा असेल तर दिवा हा प्रज्वलीत करायलाच हवा. देवापुढे आपण जेव्हा दिवा प्रज्वलीत तेव्हा सर्व देवी देवतासुद्धा प्रसन्न होतात. असं म्हणतात कि दिव्यामधून मोठ्या प्रमाणात सकारत्मक ऊर्जा बाहेर पडते कि जी आपल्या घरातील वातावरण प्रफुल्लित करते आणि घरामध्ये सकारत्मक ऊर्जा निर्माण करते.

आपल्या घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अंधार असतो किंवा आपल्या घरातील बाथरूम असेल , टॉयलेट असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नकारत्मक ऊर्जा साठलेली असते. किंवा आपल्या घरात अडगळीचं सामान पडलेलं असेल तर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात नकारत्मक ऊर्जा साठलेली असते. हि ऊर्जा नष्ट करण्याचं काम हा दिवा करतो आणि म्हणून सकाळ-सायंकाळ आपण हा दिवा नक्कीच प्रज्वलीत करा. 

हा दिवा प्रज्वलीत करताना बऱ्याच जणांना सवय असते कि त्याच दिव्याने दुसरा दिवा लावला जातो किंवा पेटवला जातो हि अत्यंत चुकीची गोष्ट आहे. हे कधीच करू नका. दिवा हा स्वच्छ असावा , घासून काढलेला असावा. बऱ्याच जणांच्या घरचे दिवे पाहीले  तर किती दिवसांमधून घासलेले व पुसलेले नसतात. दिवा तुटलेला फुटलेला सुद्धा नसावा. त्यातून तेलाची किंवा तुपाची गळती होऊ नये यांची आपण काळजी घ्यायला हवी.

तसंच दिव्याची जी वात आहे ती खूप मोठी किंवा खूप छोटी हि नसावी. दिवा लावताना तो एकतर आपण तेलाचा लावावा किंवा तुपाचा लावावा. घरामध्ये २ ठिकाणी तेलाचाही  आणि  तुपाचाही  दिवा लावू नका. तूप वापरताना ते शक्यतो देशी गायीचे असेल याची काळजी घ्या. देशी गायीचे जे दूध असत त्या मध्ये प्रचंड प्रमाणात सकारत्मक ऊर्जा असते. 

zeenews.india.com
मित्रांनो असा कोणताही दिवा आपण लावा पण त्या मध्ये एक वडी कापूर टाकायचं आहे. त्या दिव्यामध्ये एक वडी आपण कापूर जर आपण टाकलात जो परिणाम साधतो त्याच वास्तू शास्त्रांमध्ये , ज्योतिषशास्त्रांमध्ये प्रचंड महत्व आहे. ज्या ज्या वेळी आपण कापूर प्रज्वलीत करतो त्या वेळी घरातील रोगजंतु आणि जीवजंतू नष्ट होतात. असे जीवजंतु जे मानवास हानिकारक आहेत. ते नष्ट होतात आणि याचे वैज्ञानिक पुरावे सुद्धा आहेत. तर मित्रांनो आपण हा कापूर तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकायचा आहे. हा कापूर टाकल्यांनंतर आपल्या घरातील वातावरण सकारत्मक बनण्यास आणखी मदत होते यामुळे घरातील आजारपण दूर होत. 
मित्रांनो जर हि माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Admin

7 thoughts on “देवघरात दिवा लावताना दिव्यात टाका ही 1 वस्तू घरात त्यामुळे आजारपण नावालाही उरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *