10 एप्रिल 2022 श्री राम नवमी शुभ मुहूर्त आणि पुजा विधी
नमस्कार मित्रांनो,
रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा राम नवमी रविवार 10 एप्रिल 2022 रोजी आहे. भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी 12 वाजता झाला. अलौकिक, दिव्य पुरुष आणि रघुकुलदीपक असलेल्या श्रीरामांच्या नावाने ही तिथी राम नवमी म्हणून साजरी केली जाते. जाणून घेऊया तिथी, मुहूर्त, पूजाविधी आणि महत्व.
श्री राम नवमीचा सण दरवर्षी मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, राम नवमी हा हिंदू धर्मातील शुभ सणांपैकी एक आहे. हा सण चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा राम नवमी रविवार 10 एप्रिल 2022 रोजी आहे. हा दिवस भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान राम यांचा जन्म म्हणून साजरा केला जातो. जाणून घेऊया तिथी, मुहूर्त, पूजाविधी आणि महत्व…
राम नवमीचा शुभ मुहूर्त
चैत्र शुद्ध नवमी प्रारंभ – 9 एप्रिल रोजी रात्री 8 वाजून 24 मिनिटे
चैत्र शुद्ध नवमी समाप्ती – 11 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजून 15 मिनिटे
श्रीराम पूजनाचा मुहूर्त – 10 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजून 06 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 39 मिनिटे
राम नवमीचा पूजाविधी
नवमी तिथी प्रारंभ झाल्यावर नेहमीप्रमाणे सुचिर्भूत व्हावे. प्रभू श्रीरामांची प्रतिमा किंवा श्रीरामांची मूर्ती एका चौरंगावर स्थापन करावी. श्रीराम पूजनाचा संकल्प करावा. श्रीरामांचे आवाहन करून पंचामृताचा अभिषेक करावा. यानंतर मुख्य अभिषेक करावा. अभिषेकानंतर हळद-कुंकू, चंदन, फुले अर्पण करावीत.
यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. आरती करावी. मनापासून नमस्कार करून श्रीरामांचे शुभाशीर्वाद घ्यावेत. पूजा झाल्यानंतर रामचरितमानस, रामरक्षा आणि शक्य असल्यास रामायणाचे पारायण करावे. व्रताचा संकल्प केलेल्यांनी दिवसभर केवळ फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताची सांगता करावी.
राम नवमी महत्व
मर्यादा पुरुषोत्तम, अयोध्येचा आदर्श राजा, सत्यवचनी, भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी 12 वाजता झाला. अलौकिक, दिव्य पुरुष आणि रघुकुलदीपक असलेल्या श्रीरामांच्या नावाने ही तिथी राम नवमी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी देशभरात अनेक ठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते.
श्रीरामांचे संपूर्ण जीवन एक आदर्श जीवन होते. देवाचा अवतार असले, तरी त्यांचे आयुष्य परीश्रमयुक्त असेच होते. मानवी जीवनाचे सर्व भोग श्रीरामांनी भोगले. राजा दशरथाचे ज्येष्ठ पुत्र असूनही वनवास त्यांना चुकला नाही.
रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामांचा जन्म झाला, असे सांगण्यात येते. राम नवमीला केलेल्या व्रतामुळे माणसाच्या मनोवांच्छित इच्छा पूर्ण होतात. रामरक्षा पठणाने सर्व कष्टांचे निवारण होते, असे मानले जाते.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.